वीज चोरी रोखण्यासाठी तारांऐवजी कोटेड केबल : तळोदा शहरात उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:51 AM2018-02-09T11:51:47+5:302018-02-09T11:52:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चिनोदा : वीज चोरी रोखण्यासाठी तळोदा शहरात वीज पुरवठा करणा:या वाहिन्या बदलून त्याऐवजी बंच केबल टाकण्याच्या कामांना सुरूवात झाली आह़े यातून शहरातील वीजचोरी बंद होणार आह़े
तळोदा शहरात ब:याच ठिकाणी वीज चोरी होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्यासह कमी दाबाने वीजचा पुरवठा होण्याची समस्या वाढली होती़ यातून शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांच्या घरांमध्ये वीज उपकरणे जळण्यासह अनेक समस्या उद्भवत होत्या़ यावर मार्ग काढत तळोदा येथील विज वितरण कंपनीकडून बंच केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आह़े शहरातील वीर ख्वाजा नाईक चौक, प्रधान हट्टी, पाडवी हट्टी, रामगढ, मरिमाता चौक या परिसरात सध्या केबल टाकण्याचे काम सुरू आह़े
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे वीज कनेक्शन घेण्यासाठी अनेकांच्या रांगा लागत असून तळोदा शहरातील वीज चोरीची समस्या निकाली निघणार असल्याचा दावा विज कंपनीच्या अधिका:यांकडून करण्यात येत आह़े शहरातील विविध भागातील वीज तारा बदलण्याचे काम सुरू असल्याने गेल्या दोन दिवसांपासून विज पुरवठा सातत्याने बंद होत आह़े शहरात वीज चोरीचे प्रकार वाढले असल्याने सामान्य त्रस्त होत़े दोन दिवसांपासून मोहिम सुरू झाल्यानंतर तब्बल 120 जणांनी नवीन कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत़ वीज कंपनीकडून तळोदा शहरात तब्बल साडेनऊ किलोमीटर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आह़े हे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होणार आह़े यामुळे तळोदा शहर आकडेमुक्त होणार आह़े
4एकीकडे शहर आकडेमुक्त होण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपनीकडून केबल टाकणा:या तांत्रिक कर्मचा:यांना पंजे, बूट यासह इतर साहित्यही देण्यात आलेले नसल्याचे समारे आले आह़े