हवेचा दाब वाढल्याने खान्देशात आठवडाभर थंडीची लाट
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: December 18, 2018 12:36 PM2018-12-18T12:36:04+5:302018-12-18T12:36:16+5:30
खान्देशची स्थिती : जळगाव व धुळे 10 तर नंदुरबार 13 अंशावर स्थिर
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींमुळे राज्यात सध्या हवेचा दाब 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका निर्माण झाला आह़े तसेच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेचा ओघ असल्याने आठवडाभर खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला आह़े
गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या किमान तापमानात वेगाने घट होताना दिसून येत आह़े उत्तरेकडील जम्मू-काश्मिर, शिमला आदी ठिकाणी होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे हवेचा दाब वाढला आह़े त्यामुळे उत्तरेकडून शितलहरींचा प्रभाव वाढला आह़े काश्मिरमध्ये 1 हजार 18 हेक्टापास्कल तर शिमला येथे 1 हजार 17 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आह़े सध्या वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव आह़े हवेचा दाब जास्त राहिल्यास थंडीचा प्रभाव वाढत असतो़ तर हवेचा दाब कमी राहिल्यास कमाल तापमानात वाढ होत असत़े हवेच्या दाबाच्या या व्यस्त प्रमाणामुळे राज्यातील थंडीचा जोर पुढील आठवडाभर कायम राहणार आह़े
दरम्यान सोमवारी जळगावात कमाल तापमान 26.6 अंश तर किमान तापमान 10.5 अंश सेल्शिअस, धुळ्याचे कमाल तापमान 27 अंश तर किमान तापमान 10 अंश सेल्शिअस इतके नोंदविण्यात आल़े नंदुरबारात मात्र कमाल तापमान 28.1 तर किमान तापमान 13.2 अंश सेल्शिअस इतके नोंदविण्यात आल़े नाशिक येथे किमान तापमानाचा पारा घसरुन 9.4 अंशावर स्थिरावला तर कमाल तापमान 25.1 इतके नोंदविण्यात आल़े आतार्पयचे सर्वात कमी किमान तापमान निफाड येथे नोंदविण्यात आले असून शुक्रवारी तेथे 7 अंश सेल्शिअस इतके किमान तर 28 अंश इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आह़े यंदा राज्यात झालेल्या कमी पजर्न्यामुळे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत राज्यात थंडीची तीव्रता जाणवत नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आह़ेबंगालच्या उपसागरात ‘फेथाई’ या चक्रीवादळाची निर्मिती झालेली आह़े या चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत होती़ परंतु आता हे वादळ ओरिसाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे राज्यात आता अवकाळी पावसाची शक्यता मावळली असल्याचे मत हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल़े
हवेचा ओघ जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असल्याने उत्तर महाराष्ट्रात आठवडाभर थंडी कायम असेल़ उत्तरेकडील प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने शितलहरींचा प्रभाव वाढणार आह़े महाराष्ट्रात 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आह़े -डॉ़ रामचंद्र साबळे,
हवामानतज्ज्ञ, पुण़े