तळोदा पालिकेकडून वाद्य पथकाव्दारे करवसुलीची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:32 AM2018-03-27T11:32:43+5:302018-03-27T11:32:43+5:30
वसुली करतांना व्हीडीओ शुटींगचाही होतोय वापर
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : तळोदा येथील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून वाद्य पथकाचा वापर करण्याचा फंड्डा वापरला जात आह़े थकबाकीदारांच्या अंगणात जावून वाजंत्रीचा गजर केला जात आह़े
साहजिकच प्रतिष्ठेपोटी थकबाकीदारही तातडीने आपल्या जवळील थकीत रक्कम भरत आहेत़ पालिकेच्या अशा क्लृप्तीमुळे वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे आतार्पयत साधारणत 40 टक्के वसुली करण्यात आली आह़े शहरातील नागरिकांच्या विविध मालमत्तेच्या करापोटी पालिकेची 1 कोटी 10 लाख रुपयांची रक्कम थकीत राहिली आह़े या वसुलीसाठी पालिकेने थकबाकीदारांना सातत्याने सूचना दिल्या आहेत़ याशिवाय नोटीसादेखील बजावल्या आहेत़ असे असताना थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती होती़ या पाश्र्वभूमिवर पालिकेने बॅण्ड पथक लावून कर वसुली करण्याचा निर्णय घेतला़ गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पथक थकबाकीदारांच्या अंगणात वाद्याचा गजर करीत आह़े आपल्या अंगणातून लगAाची मिरवणुक जात असावी हे पाहण्यासाठी घरमालक बाहेर येतात़ तेव्हा त्यांना मिरवणुक ऐवजी पालिकेचे पथक नजरेस पडत़े त्या वेळी कर्मचारी वसुलीची यादी काढून वसुली मागतात़ साहजिकच आपली प्रतिष्ठा जावू नये म्हणून थकबाकीदारदेखील तातडीने कराची रक्कम देतात़
वसुलीसाठी जप्तीचे वाहन व कर्मचा:यांसोबत ताफा यामुळे आजूबाजूच्या नागरीकांकडूनही मोठी गर्दी होत असत़े पालिकेचा वसुलीच्या या फंडय़ामुळे आतार्पयत 40 टक्के वसुली झाल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितल़े सदर वसुलीसाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक राजेंद्र सैदाणे, मिळकत व्यवस्थापक विजय सोनवणे, करनिरीक्षक राजेश पाडवी, वसुली लिपीक अनिल माळी, सूनील सूर्यवंशी, दिगंबर माळी, नितीन शिरसाठ, दिलीप वसावे, राजेंद्र माळी, अश्विन परदेशी, आदींनी परिश्रम घेतल़े
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वात कमी वसुली तळोदा नगरपालिकांची असल्याने जास्ती जास्त वसुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालिकेस तंबी दिली आह़े त्यामुळे वसुली कर्मचारीही जोमात कामास लागले आहेत़ मार्चअखेरीस वसुली करण्याचे त्यांच्यापुढे मोठे आवाहन असणार आह़े