प्रभारी जिल्हाधिका:यांकडून सारंगखेडा यात्रेकरुंच्या सुविधांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:18 PM2017-11-28T12:18:23+5:302017-11-28T12:18:31+5:30
ल कमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेला आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने यात्रेची व चेतक फेस्टीव्हलमार्फत होणा:या उपक्रमांची तयारी जोरात सुरू आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी यात्रास्थळ व इतर जागांची पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना केल्या.सारंगखेडा यात्रा महोत्सव यंदा आगळा-वेगळा होत असून पर्यटन विभाग व चेतक फेस्टीव्हल समितीमार्फत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात अश्व स्पर्धा, महिलांसाठी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची मेजवानी यात्रेकरू व भाविकांना मिळणार आहे. यात्रा महोत्सवात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध मान्यवर हजेरी लावणार आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी टेंभा रस्त्यावरील टेंट सिटी, घोडा बाजार, मुख्य बाजार, भांडी बाजार, आनंद मेळा आदी जागांची पाहणी करून फेस्टीव्हलच्या आयोजकांकडून माहिती जाणून घेतली. यात्रा परिसरात स्वच्छतेबाबत व व्यावसायिकांनी आपली दुकाने नेमून दिलेल्या जागेतच लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांना दिली. वाहने पार्कीगच्या जागेची पाहणी करून लोंबकळणा:या वीज तारा व खांबांची दुरुस्ती, यात्रेकरूंना वीज, पाणी, घोडे बाजारात पुरविल्या जाणा:या सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री व इतर मान्यवर यात्रा महोत्सवात येणार असल्याने हेलिपॅडच्या जागेची पाहणीही त्यांनी केली. टेंभा रस्त्यावर उभारण्यात येणा:या टेंट सिटीसमोरील जागा व पर्यायी जागा म्हणून कळंबू येथील बीजगुणन केंद्रात जाऊन त्यांनी पाहणी केली. यात्रा काळात महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करून संबंधित विभागांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.या वेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, रणवीर रावल, ग्रा.पं. सदस्य चंद्रपाल रावल व चेतक फेस्टीव्हल समितीे सदस्य उपस्थित होते.