सलून दुकानदारांनी बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:47 AM2020-07-01T11:47:04+5:302020-07-01T11:47:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिशन बिगीन अगेनच्या दुसºया टप्प्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सलुन दुकाने, ब्युटी पार्लर, बार्बर शॉप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मिशन बिगीन अगेनच्या दुसºया टप्प्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सलुन दुकाने, ब्युटी पार्लर, बार्बर शॉप सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सलून संघटना आणि नाभीक संघ यांनी बैठक घेऊन सदस्यांना दक्षतेच्या सूचना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यांतर्गत एका वेळेस दुकानात दोन किंवा तीन पेक्षा अधिक ग्राहकाना प्रवेश देऊ नये. दुकानात ग्राहकांसाठी ब्लेडचा वापर न करता एकाच वेळी वापरात येणारे युज अँड थ्रो रेझर ब्लेड वापरावेत. दुकानात काम करणाºया कामगार, कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने लावण्यासह ग्लोव्हज, अॅप्रॉन व मास्कचा वापर करावा़ प्रत्येक ग्राहकांना सेवा दिल्यानंतर सर्व दुकानातील खुर्च्या व परिसर यांचे निजंर्तुकीकरण करणे बंधनकारक राहील. डिस्पोजल टावेल, नॅपकीनचा वापर ग्राहकांवर करणे बंधनकारक राहील. सेवा देण्यापूर्वी व दिल्यानंतर नॉन डिस्पोजल सामुग्रीचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सूचनांचे ठळक अक्षरात ग्राहकांना दिसतील असे फलक दुकानात लावावे आदी सूचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबधितांविरोधात चौकशी करुन कारवाई करुन दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे़
दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सलून व ब्युटीपार्लर यांचे व्यवसाय करणाºयांचे मोबाईल क्रमांक, दुकानांची माहिती तसेच पत्ते एकत्रित करुन त्याची नोंदवही तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत़ ही दुकाने रविवारपासून सुरु करण्यात आली आहेत़