नवापूर तालुक्यातील विकास कामांचा जिल्हाधिका:यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:16 PM2019-05-30T21:16:44+5:302019-05-30T21:16:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : धुलीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या 1 जुलै पासून कार्यान्वित करावे व तालुक्यात सुरू ...

Collectorate of development works in Navapur taluka: Review by | नवापूर तालुक्यातील विकास कामांचा जिल्हाधिका:यांकडून आढावा

नवापूर तालुक्यातील विकास कामांचा जिल्हाधिका:यांकडून आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : धुलीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या 1 जुलै पासून कार्यान्वित करावे व तालुक्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी संबंधीत विभागांनी करावी अश्या सूचना जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे यांनी दिल्या. 
नवापूर तालुक्यातील गाव निहाय विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे नवापूर तालुक्यात प्रथमच आल्याने तालुक्यातील अधिकारीच्या भुवया चांगल्याच उंचावलेल्या दिसत होत्या. धुलीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू असून, अत्यत देखणी इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे कौतुक करून लोकांसाठी हे उपकेंद्र 1 जुलै पासून सेवेत आणावे अश्या सूचना त्यांनी केल्या. तसेच नवापूर शहरातील नेहरू उद्यान व इतर उद्यानाची झालेली दयनीय अवस्थेचीही जिल्हाधिकारी मंजुळे यांनी पाहणी करत अधिका:यांना समज देवून संबंधीत उद्यानाची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या सूचना तहसील कार्यालय व पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत अधिका:यांना दिल्या. दुपारी एक वाजता  जिल्हाधिकारी यांचे आगमन झाले. तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिका:यांकडून तालुक्यात जावूंन खासदार, आमदार निधितून झालेली व इतर विभागाकडून झालेल्या विकास कामांची त्यांनी माहिती घेतली. सोनपाडा येथील विद्युत रोहित्र कागदोपत्री असताना काम झालेले नसल्याचे निदर्शनात आल्याने नाराजी व्यक्त केली असून, इतर कामांबाबत समाधानी असल्याचे  जिल्हाधिका:यांनी म्हटले आहे. दुपारी पाच वाजता नगर पालिका सभागृहात बैठक घेऊन स्वच्छता व शहरातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या.
   जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबारला आल्यानंतर प्रथमच नवापूर शहरात आगमन झाले. त्यानिमित्त नवापुरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटनेता गिरीश गावीत, सर्व नगरसेवकांनी शाल व पुष्प गुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी  तहसीलदार सुनीता ज:हाड व तालुक्यातील सर्व  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Collectorate of development works in Navapur taluka: Review by

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.