निसर्ग पर्यटन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:46 PM2020-01-06T12:46:58+5:302020-01-06T12:47:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वनविभागाने साकारलेला ठाणेपाडा येथील निसर्ग पर्यटन प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी भेट देत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वनविभागाने साकारलेला ठाणेपाडा येथील निसर्ग पर्यटन प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी भेट देत पाहणी केली़ या प्रकल्पाला रविवारपासून कार्यान्वित करण्यात आले असून यांतर्गत येथे बोटींगची सोय करण्यात आली आहे़
ठाणेपाडा येथील रोपवाटिका परिसर आणि कापरा धरण परिसरात वनविभागाने निसर्ग पर्यटनाची संकल्पना राबवली आहे़ यांतर्गत २० हेक्टर क्षेत्रात बांबू वन, कॅक्टस गार्डन, बोलोद्यान तयार करण्यात आले आहे़ या उपक्रमांसोबतच अनेक पर्यटन प्रकल्प येथे प्रस्तावित आहेत़ याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ भारुड याठिकाणी आले होते़ यावेळी त्यांच्यासोबत सहायक वनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे यांच्यासह वनकर्मचारी होते़
ठाणेपाडा येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून राबवल्या ेगेलेल्या या प्रकल्पातून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना निसर्ग पर्यटनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे़ यांतर्गत तोरणमाळनंतर जिल्ह्यात ठाणेपाडा येथील या केंद्रात बोटींगची सुविधा करण्यात आली आहे़ सहा बोटींसाठी पोहण्यात तरबेज असलेल्या चार ग्रामस्थांचे प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांना याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे़ बोटींगसाठी नाममात्र शुल्क वनविभाग वसूल करणार असून या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या़