सीमा तपासणी नाक्यावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 01:04 PM2020-11-27T13:04:08+5:302020-11-27T13:04:17+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  महाराष्ट्र राज्याच्या शेजारील गुजरात राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता यामुळे ...

'Come home your home' at the border checkpoint | सीमा तपासणी नाक्यावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

सीमा तपासणी नाक्यावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  महाराष्ट्र राज्याच्या शेजारील गुजरात राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घोषणा केली आहे. परंतु नवापूर सीमा तपासणी नाक्यावर पहिल्या दिवशी आरोग्य सेवक, पोलीस, महसूल कर्मचारी उशीराने पोहोचले. सकाळी आठ वाजता  उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात दुपारनंतर तपासणी सुरू झाली आणि संध्याकाळी पुन्हा बंद यासंदर्भात आरोग्य तपासणी साहित्य उशीराने मिळाल्याने विलंब झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल, वाहनांची तपासणी केली जाईल, अशी घोषणा राज्यातील विविध मंत्र्यांनी केली. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर होताना दिसून आली नाही. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती या सीमावर्ती भागात     दिसून आली. उशीराने दाखल        होऊन अधिकाऱ्याने फोटोसेशन   करून पुन्हा संध्याकाळी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. प्रवाशांकडे कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे, असे बंधनकारक केले असता राज्यांच्या सीमेवर काळजीपूर्वक तपासणी करण्यात येत नसल्याने   राज्य सरकारचा आदेश हवेतच    विरला आहे. प्रवाशांची तपासणी      होत नसल्याने कोरोना रुग्ण आले किती? आणि गेले किती? याची माहिती मिळणार नाही, अशी परिस्थिती सीमा भागात दिसून आली. जी परिस्थिती महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती आहे तीच परिस्थिती महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमावर्ती दिसून आली.
शेजारील गुजरात राज्यातील अहमदाबाद ,वडोदरा, सुरत व दिल्लीत कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेतली आहे. परराज्यातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकाराने कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. सीमावर्ती भागातील तालुकास्तरावर अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. परंतु पहिल्या दिवशी नवापूर तपासणी नाक्यावर कोरोनाची तपासणी करणारी यंत्रणा सकाळी दिसून     आली नाही. केवळ एकच मंडळ अधिकारी नागेश चौधरी उपस्थित   होते. आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता हजर राहण्याचे आदेश असताना दुपारपर्यंत तपासणी सुरूच झाली नाही. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी तपासणी साहित्य उशीरा मिळाल्याने विलंब झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात गुजरात राज्यातील उच्छल पोलीस वाहनांची तपासणी करताना दिसून आले. तर नवापूर पोलीस ठाण्यातील केवळ दोन-तीन होमगार्ड ड्युटीवर दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली नाही. दुपारनंतर तालुक्यातील अधिकारी कामाला लागले.
गुजरात, राजस्थान व अन्य राज्यातून नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या बसेस, कार, खाजगी ट्रॅव्हल्स, ट्रक, टेम्पो रिक्षामधील प्रवाशांची कुठलीही तपासणी सकाळपासून दुपारपर्यंत झाली नाही. आदेश केवळ कागदावरच आहे की काय? असा सवाल उपस्थित केला गेला. यापूर्वी तालुक्यातील तत्कालीन  पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिश्चंद्र कोकणी जातीने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करीत होते. नव्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या अधिकाऱ्यांसारखी कोरोना उपाययोजनांबाबत तत्परता दाखवणे गरजेचे आहे.
शेजारील गुजरात राज्यातून रस्ते महामार्गाने व लोहमार्गाने  नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना ९६ तास आधी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. या चाचणीत आरटीपीसीआर नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यास राज्यात प्रवेश मिळणार आहे. जर कोणी सुरतहून प्रवाशी विमानाने नंदुरबार जिल्ह्यात येत असेल तर ७२ तासापूर्वी त्या व्यक्तीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीच्या रिपोर्टशिवाय येण्या-जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तर दुसरीकडे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसेल तर त्यांची थर्मल स्क्रिनिंग आणि तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे.
सरकारच्या आदेशानुसार जर कोणाकडे प्रवासापूर्वी चाचणी   अहवाल नसेल तर त्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.

पहिल्या दिवशी नवापूर तालुक्यातील अनेक सीमा खुल्या
नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा गावानजीक सीमा तपासणी नाक्यावर काही काळ पोलीस बंदोबस्त, आरोग्य तपासणी पथक दिसून आले. परंतु नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात भागातील होळीपाडा, चंदापूर, आमलाण, सुंदरपूर, उकळापाणी, करंजवेल, नवागावनजीक आरोग्य तपासणी पथक अथवा पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही. या भागातील सीमावर्ती भागात सर्रास गुजरात राज्यातील वाहने, प्रवाशी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करीत होते. यावर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी नवापूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

खाजगी बसमधून २० प्रवासी बसून राजस्थान होऊन महाराष्ट्रातील  विदर्भात जात होतो. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर आमची कोरोनाची कुठलीही तपासणी करण्यात आली नाही. आरटीओ अधिकाऱ्याने बसचे कागदपत्र तपासले.
-नितीनकुमार, 
बसचालक, राजस्थान.
 

Web Title: 'Come home your home' at the border checkpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.