महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:26 PM2017-12-17T13:26:16+5:302017-12-17T13:26:21+5:30

Coming under Shahada sub-division of MSEDCL | महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े 
शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 हजार, शहादा क्रमांक 2 मधील 1 हजार 263 ग्राहकांकडून 88 लाख 7 हजार, तळोदा येथील 1 हजार 166 कृषिपंपधारकांकडून 68 लाख 64 हजार तर अक्कलकुवा येथील 484 कृषिपंपधारकांकडून 27 लाख 54 हजार तसेच धडगाव येथील 44 कृषिपंपधारकांकडून दोन लाख 60 हजार असे एकूण चार तालुक्यातील 4 हजार 305 कृषिपंपधारकांकडून 3 कोटी रुपयांची वसुली अद्याप करण्यात आलेली आह़े 
शहादा उपविभागासह इतरही कृषिपंपधारकांकडे कोटय़ावधी रुपयांची वीज बिल थकबाकी आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी असलेल्या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती़ यामुळे संबंधित कृषिपंपधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती़
 ऐन रब्बी हंगामात कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत असल्याने कारवाईसाठी आलेल्या महावितरणचे अधिकारी व संबंधित कृषिपंपधारक यांच्यात वादही होत असत़ 
कृषिपंपाची ऐवढी थकबाकी भरणे शक्य नसल्याचे संबंधित कृषिपंपधारकांकडून वेळोवेळी महावितरणच्या अधिका:यांना सांगण्यात आल़े परंतु थकबाकी भरली नाही तर, वीज जोडणी खंडीत करण्याची कडक भूमिका महावितरणकडून घेण्यात आली होती़ त्यामुळे यानुसार सुमारे 800 थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीजजोडणी खंडीतही करण्यात आली होती़ परंतु त्यानंतर राज्य शासनाकडून  30 नोव्हेंबर्पयत कुठल्याही थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीजजोडणी खंडीत करण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती़ तथापि त्यानुसार सुमारे 800 कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला होता़ 
परंतु शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम पूर्ण झाला आह़े त्यामुळे पुन्हा थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या मनात कारवाईची धडकी भरली असल्याचे दिसून येत आह़े सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्यभरातील थकबाकीदार कृषिपंपधारकांबाबत यात निर्णय झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे शहादा उपविभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्याकडून सांगण्यात आले आह़े 
पावसाअभावी शेतक:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे उत्पन्नातही घट झाली होती़ त्यामुळे याचा विचार करुन शासनाने कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संबंधित कृषिपंपधारकांकडून करण्यात आली आह़े 
 

Web Title: Coming under Shahada sub-division of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.