कोरोनाला हरवण्यासाठी जिल्ह्यात नियुक्त होणार कम्युनिटी हेल्थ ऑफिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:52 PM2020-04-24T12:52:18+5:302020-04-24T12:52:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला हरवण्यासाठी आरोग्य विभागा सक्षम करण्यावर शासन भर देत असून जिल्ह्यातील विविध भागात कम्युनिटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाला हरवण्यासाठी आरोग्य विभागा सक्षम करण्यावर शासन भर देत असून जिल्ह्यातील विविध भागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यांतर्गत परीक्षा दिलेल्या 58 जणांची लवकरच नियुक्ती होऊन त्यांना वैद्यकीय सेवेत घेण्यात येणार आह़े
एनआरएचम अंतर्गत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी बीएएमस, बीयूएमएस आणि बीएस्सी नर्सिग पदवी घेतलेल्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यात येतो़ यांतर्गत जिल्हा रुग्णालयातून 58 जणांनी प्रशिक्षणचा कालावधी पूर्ण केला होता़ यात 15 बीएएमस, 5 बीयूएमएस तर उर्वरित बीएस्सी नर्सिग पदवीधारक आहेत़ प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली आह़े दोनवेळा तोंडी परीक्षाही झाली होती़ केवळ पीएसएम या विषयाची तोंडी परीक्षा शिल्लक होती़ राज्यातील बहुतांश ठिकाणी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काहींना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या़ परंतू नंदुरबार जिल्ह्यासाठी शासनाने याबाबत अधिकृत असे आदेश दिले नव्हत़े या वैद्यकीय अधिका:यांच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीला आहेत़ समितीकडून कोरोनासाठी आरोग्य यंत्रणा मजूबत करण्यावर विचारविनिमय होत असताना या नियुक्त्या करण्याबाबत चर्चा सुरु होती़ दरम्यान शासनाकडून सर्व 58 जणांना अधिकृत नियुक्त्या देण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर कारवाई सुरु आह़े येत्या आठवडय़ात नियुक्ता मिळणा:या या प्रशिक्षित वैद्यकीय अधिका:यांना कोरोना आयासोलेशन आणि विलगीकरण कक्षांमध्ये सेवेसाठी पाठवले जाऊ शकत़े यातून आरोग्य विभागाच्या कामकाजाला बळ मिळणार आह़े
तूर्तास जिल्ह्यात विविध सात ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक हे 24 तास दाखल असलेल्यांची सुश्रुषा करत आहेत़