तळोदा तालुक्यात 1262 घरकुलांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण
By admin | Published: April 10, 2017 05:34 PM2017-04-10T17:34:26+5:302017-04-10T17:34:26+5:30
तळोदा तालुक्यातील एक हजार 230 घरकुलांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लाभाथ्र्याना निधीचा पहिला हप्तादेखील वितरित करण्यात आला आहे.
Next
तळोदा,दि.10- तालुक्यातील एक हजार 230 घरकुलांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लाभाथ्र्याना निधीचा पहिला हप्तादेखील वितरित करण्यात आला आहे. घरकुलाची ऑनलाईन प्रक्रिया अतिशय किचकट असतानाही प्रक्रिया राबविण्यात तळोदा पंचायत समिती जिल्ह्यात अग्रेसर ठरली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत केंद्र शासनाने घरकुलांच्या अनुदानातदेखील मोठी वाढ केली आहे. पूर्वी एक लाख अनुदान असलेल्या या घरकुलास शासनाने आणखी 20 हजारांची वाढ केली आहे. या शिवाय रोजगार हमी योजनेतून लाभार्थीस 18 हजारांचे अनुदान निर्धारित केले आहे. या योजनेत पूर्वी लाभाथ्र्याच्या दोन हजार रुपयांचा हिस्सा होता. तथापि यंदापासून लाभाथ्र्याना शासनाने पूर्ण अनुदान दिले आहे.
तळोदा तालुक्यात यंदा साधारण एक हजार 230 घरकुले मंजूर करण्यात आली आहे. तत्पूर्वी ग्रामसभेत घरकुल योजनेच्या लाभाथ्र्याची निवड करण्यात येत असते. ग्रामसभेत निवड झालेल्या लाभाथ्र्याची यादी केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे मंज़ुरीसाठी द्यावी लागते. त्यानंतर केंद्र शासनाकडे लाभाथ्र्याची ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते. यात लाभाथ्र्याचे दारिद्रय़ रेषेचे कार्ड, जॉब कार्ड, आधार कार्ड, बँक खाते, अशी वेगवेगळी माहिती ऑनलाईन शासनास सादर करावी लागते, अशी ही सगळी किचकट माहिती येथील पंचायत समिती प्रशासनाने युद्धपातळीवर पूर्ण करून केंद्रशासनाच्या संबंधित विभागाकडे सादर केली. त्यामुळे शासनानेही लाभाथ्र्याना तातडीने घरकुलाचा निधी मंजूर केला आहे. साधारण 14 कोटी 76 लाख रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे. पंचायत समितीनेही घरकुलाच्या मंजूर निधीपैकी घराचे मूल्यमापन करत पहिला हप्ता संबंधित लाभाथ्र्याना वितरित केला आहे.
तळोदा तालुक्यात एकूण 91 गावे आहेत त्यापैकी 67 गावांमधील एक हजार 262 लाभाथ्र्याचा प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी एक हजार 230 लाभाथ्र्याची डी.आर.एस. ऑनलाईन प्रणाली यशस्वी झाली. गावनिहाय मजूर घरकुले अशी- आलवान (34), अंमलपाडा (17), आमलाड (चार), अमोनी (53), बंधारे (13), बेलीपाडा (16), भवर (23), बोरद (40), बुधावल (33), चौगाव बुद्रूक (13), छोटा धनपूर (13), चिनोदा (14), चौगाव खुर्द (28), दलेलपूर (15), दसवड (62), धानोरा (10), धनपूर (12), इच्छागव्हाण (24), खेडले (आठ), कडेल (12), करडे (26), खर्डी (27), काजीपूर (11), खर्डी बुद्रूक (37), खर्डी खुर्द (20), खरवड (26), खुषगव्हाण (10), कोठार (27), लाखापूर फॉरेस्ट (45), लाखापूर रेव्ह न्यु, लोभाणी (25), मालदा (33), मोड (57), मोदलपाडा (35), मोहिदा (नऊ), मोरवड (10), नळगव्हाण (21), नर्मदानगर (पाच), नवागाव (12), न्युबन (10), पाडळपूर (20), पिंपरपाडा (10), प्रतापपूर (23), राजविहीर (20), रामपूर (25), रापापूर (17), राणीपूर (17), रांझणी (15), रापापूर (24), रतनपाडा (20), रेवानगर (तीन), रोझवे (12), रोझवा पुनर्वसन (दोन), सलसाडी (12), सरदारनगर (दोन), सावरपाडा (39), शिव्रे (15), सेलिंगपूर (15), सोमावल बुद्रूक (23), सोमावल खदरु (26), तळवे (19), त:हावद (16), तुळाजे (24), वाल्हेरी (सात), ङिारी (10) या प्रमाणे आहेत.
(तालुका प्रतिनिधी)