गटविकास अधिकाऱ्यांच्या खुलाशाविनाच चौकशी अहवाल पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:18 PM2019-03-28T12:18:17+5:302019-03-28T12:18:38+5:30
गोठे वाटपात गैरव्यवहार : प्रशासकीय नोंदवही गहाळ
नंदुरबार : अक्कलकुवा पंचायत समितीकडून रोहयोंतर्गत वाटप केलेल्या गोठ्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशी समिती अहवालात स्पष्ट झाले होते़ जबाब देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कबुली दिल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे़ परंतू यात केवळ पाचच जणांचे जबाब असून तत्त्कालीन गटविकास अधिकारी यांचा जबाब मात्र नोंदवला गेलेला नाही, असे असतानाही अहवाल सादर झाला होता़
दरम्यान दीड वर्षापूर्वी पंचायत समितीत जाऊन चौकशी करणाºया समितीला गोठ्यांचे आदेश काढणारे तसेच त्याची माहिती असलेल्या कर्मचाºयांनी ‘प्रशासकीय नोंदवही’ न दिल्याने समितीच्या कामात अडथळे आले होते़ संबधित नोंदवहीत प्रशासकीय मान्यता दिल्याच्या नोंदी होत्या़ परंतू ही नोंदवही न मिळाल्याने समितीने २५ प्रस्तावांचे अवलोकन करुन अहवाल तयार केला़ यात जबाब देणाºया अधिकारी व कर्मचाºयांपैकी एकाने २०१८ मध्ये निवृत्ती असल्याचे कारण देत, सहानुभूतीपूर्वक विचार करुन कार्यवाही करण्याची विनंती केली होती़ उर्वरित चौघांनी एकमेकांवर बोट दाखवत पुरावे सादर करण्यात टाळाटाळ केली होती़
साधारण ११ कोटी ६८ लाख रुपयांचे वितरण गोठ्यांसाठी करण्यात आल्याची माहिती आहे़ आदेश वितरीत करताना लाभार्थी मजूरांकडून पैसे घेतल्याचा संशय अहवालात व्यक्त केला आहे़
२०१७ मध्ये राजकीय पदाधिकाºयांनी अक्कलकुवा तालुक्यात गोठे वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती़ त्यानंतरही गोठ्यांचे आदेश वाटप सुरुच ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे़
--------------
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे ८० हजाराचे धान्य लंपास
नंदुरबार : दुकानाच्या गोडावूनमधून चोरट्यांनी ८० हजार रुपये किंमतीचे धान्य चोरून नेल्याची घटना खेडदिगर, ता.शहादा येथे घडली. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडदिगर येथे मनोज नारायण चौधरी, रा.खेतिया यांचे धान्य दुकान आहे. तेथेच गोडावून देखील आहे. गोडावून फोडून चोरट्यांनी एकुण ८० हजार ५०० रुपयांचे धान्य चोरून नेले. त्यात ४८ हजार रुपये किंमतीचा हरभरा, १४ हजार रुपये किंमतीचा गहू, १६ हजार रुपयांचे सोयाबीन, अडीच हजार रुपयांचा कापूस यांचा समावेश आहे.
सकाळी गोडावूनचे शटर उचकवलेले आढळून आले. आत चोरी देखील झाल्याची बाब लक्षात आल्यावर म्हसावद पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला.
याबाबत मनोज नारायण चौधरी यांनी फिर्याद दिल्याने म्हसावद पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.