नंदुरबार पालिकेकडून कच_यापासून कंपोस्ट खताची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:29 PM2019-01-27T17:29:20+5:302019-01-27T17:29:27+5:30
नंदुरबार पालिका : ओला व सुका कचरा संकलन
नंदुरबार : पालिकेच्या कचरा संकलन केंद्रात लवकरच खत निर्मितीला सुरवात होणार आहे. त्यासाठीची मशिनरी जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरात ओला व सुका कचरा संकलनाचे काम सुरू आहे.
नंदुरबार पालिकेला शासनाने घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजुर केला आहे. त्याअंतर्गत पालिकेतर्फे शहरातील स्वच्छतेचे काम केले जाते. पूर्वी याबाबतचा ठेका असलेल्या कंपनीला बदलण्यात आले असून आता पुणे येथे सेवा फाऊंडेशनला हे काम देण्यात आले आहे. त्याअंतर्गत 20 घंटागाडय़ा खरेदी करण्यात आल्यया आहेत. या द्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत केला जात आहे. गोळा केलेला कचरा कचरा डेपोमध्ये संकलीत केला जातो. ओला कच:यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे नियोजित असून त्यासाठी मशिनरी मागविण्यात आली आहे. या ठिकाणी कच:याची विगतवारी करून त्याद्वारे सुका कचरा एका बाजुला टाकून ओला कचरा मशिनरीच्यां माध्यमातून प्रक्रिया करून त्याद्वारे खत निर्मिती केली जाणार आहे. हे खत विशिष्ट बॅगांमध्ये भरून ते शेतक:यांना किफायतशीर किंमतीत विक्री केले जाणार आहे. याद्वारे देखील पालिकेला ब:यापैकी उत्पन्न मिळू शकणार आहे.
पालिकेने शासनाच्या स्वच्छ सव्र्हेक्षणात सहभाग घेतला आहे. याअंतर्गत तपासणीसाठी लवकरच समिती पहाणीसाठी येणार आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता ही समिती दाखल होऊन अचानकपणे कुठल्याही भागातील शौचालये, कचरा संकलन केंद्र, स्वच्छतागृहे तपासली जाणार आहेत. त्यामुळे पालिका यासाठी सज्ज झाली असून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी प्रय} सुरू करण्यात आले आहेत.