चायना दोऱ्यामुळे पारंपारिक मांजा तयार करणाऱ्यांवर संक्रांत
By Admin | Published: January 5, 2017 07:57 PM2017-01-05T19:57:04+5:302017-01-05T20:33:27+5:30
मनोज शेलार /ऑनलाइन लोकमत नंदुरबार, दि. 5 - चायना दोऱ्यावर बंदी असतांनाही शहरात त्याची जोरदार विक्री सुरू आहे. कारवाई ...
मनोज शेलार /ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 5 - चायना दोऱ्यावर बंदी असतांनाही शहरात त्याची जोरदार विक्री सुरू आहे. कारवाई करावी कुणी याबाबत पोलीस आणि प्रशासनात साशंकता आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने मांजा तयार करणाऱ्यांवरच यंदा ‘संक्रांत’ आली आहे.
नंदुरबार गुजरातच्या सिमेवर असल्यामुळे गुजरातचे अनेक सण, उत्सव येथे साजरे केले जातात. त्यातीलच मकरसंक्रांतीला साजरा होणारा पतंग उत्सव. या उत्सवासाठी स्थानिक स्तरावरच कारागिर पारंपारिक पद्धतीने मांजा तयार करीत असतात. त्यासाठी लाख, काचेचा चुरा आणि खळ याचा वापर केला जातो. या माध्यमातून हजारो रुपयांची उलाढाल होते. नंदुरबारात असा मांजा तयार करणारे मोजकेच कारागिर आहेत. गेल्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे मांजा तयार करण्यासाठी मोठी गर्दी होत होती. यंदा मात्र चायना दोऱ्याने अर्थात नॉयलॉनच्या दोऱ्याने अतिक्रमण केल्याने या कारागिरांवर संक्रात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्मेही व्यवसाय होत नसल्याची खंत कारागिरांनी व्यक्त केली. चायना दोरा टिकावू असला तरी जीवघेणा ठरत आहे. अनेकजण यामुळे आतापर्यंत जायबंदी झाले आहेत. त्यामुळे त्यांची विक्री बंद करावी अशी मागणीही होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844ndy