‘स्मार्ट नंदुरबार’चा संकल्प पूर्णत्वाकडे
By admin | Published: February 15, 2017 11:12 PM2017-02-15T23:12:23+5:302017-02-15T23:12:23+5:30
नगरपालिका : 195 कोटींचा अर्थसंकल्प, जलतरण तलावास शिवसेनाप्रमुखांचे नाव
नंदुरबार : पालिकेचा 195 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान, घरांवर रेन वॉटर हाव्रेस्टिंग करणा:यांना मालमत्ता करात पाच तर सौर ऊर्जा वापरणा:यांना दोन टक्के सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी जाहीर केला.
यंदाच्या पंचवार्षिकमधील शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना विविध करांवर सूट आणि योजना जाहीर केल्या आहेत. सकाळी 11 वाजता झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा र}ा रघुवंशी होत्या. उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, प्रभारी मुख्याधिकारी गोसावी यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि नगरसेवक उपस्थित होते.
अर्थसंकल्पांच्या भाषणात बोलताना नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी सांगितले, कुठलीही दरवाढ न करता विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सर्व विकास कामे येत्या आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. स्मार्ट नंदुरबार करण्याचा संकल्प पूर्ण होत आहे. रस्ते प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. भूमिगत गटारीचा प्रकल्पदेखील पूर्ण होत आहे. सी.टेक.च्या धर्तीवर मलनि:त्सारण केंद्रासह येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. शहरातील बेघरांसाठी 876 घरे बनविण्यात आली असून शासन निकषाप्रमाणे ते वाटप करण्यात येतील.
अद्ययावत उद्यानाचे काम नाटय़गृहा शेजारी सुरू आहे. विद्याथ्र्याना सोयीचे व्हावे म्हणून स्व.ए.पी.जे.अब्दुल कलाम ई-लायब्ररी व जड वाहनांची समस्या सोडविण्याठी ट्रक टर्मिनल येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. चौकांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. नवीन निर्माण झालेल्या चौकांना संत व महापुरुषांची नावे दिली जात आहेत. शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर प्रवेशद्वार बनविण्यात येत आहे.
सर्वच खुल्या जागांवर मुलांसाठी खेळणी व ज्येष्ठांना बसण्यासाठी बाक बसविण्यात येत आहे. नोंदणीकृत सर्व व्यायाम शाळांना अद्ययावत व्यायम साहित्य, पालिकेच्या सर्व शाळांना डिजीटल क्लासरूम तयार केला जात आहे. दोन अद्ययावत दवाखाने पालिकेच्या हद्दीत सुरू होत आहेत. एक चिरागल्ली व दुसरा परदेशीपुरा भागात सुरू होणार आहे.
ऑलंम्पिकच्या धर्तीवर पालिकेच्या टाऊनहॉलच्या मागे जलतरण तलाव बनविण्यात येत असून त्यास स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव असे नामकरण करण्यात आले आहे.
शहराची केंद्राच्या अमृत योजनेत निवड झाली असून त्याअंतर्गत शहरात 24 बाय सात अर्थात नळांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असल्याचेही नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगितले.
दरम्यान, बैठकीत अजेंडय़ावरील इतरही 44 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात विविध विकास कामांचा समावेश आहे. या विषयांनाही सभागृहात लागलीच मंजुरी देण्यात आली.
14 लाख 86 हजार 86 रुपयांची शिल्लक..
पालिकेतर्फे सादर करण्यात आलेल्या 2017-18 च्या र्अथकल्पात एप्रिल 2016 अखेर 83 कोटी 84 लाख 54 हजार 864 रुपये शिल्लक होते. मार्च 2017 अखेर अंदाजित जमा रक्कम 154 कोटी 84 लाख 71 हजार 514 रुपये आहे. एकूण जमा 238 कोटी 69 लाख 26 हजार 378 रुपये दर्शविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात येणारा अंदाजित खर्च 154 कोटी 59 लाख 48 हजार 630 आहे. मार्च 2017 अखेर शिल्लक 84 कोटी नऊ लाख 77 हजार 748 इतकी राहण्याचा अंदाज असून 2017-18 ची अंदाजे जमा 111 कोटी 46 लाख 73 हजार 104 रुपये असून एकूण 195 कोटी 56 49 हजार 852 रुपये राहणार आहे. आगामी आर्थिक वर्षाचा अंदाजित खर्च 195 कोटी 41 लाख 63 हजार 766 रुपये राहणार आहे. एकूण शिल्लक 14 लाख 86 हजार 86 रुपये राहण्याची शक्यता अंदाजपत्रकात दाखविण्यात आली आहे.