उत्तरकार्यानिमित्त वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:45 PM2019-10-18T12:45:45+5:302019-10-18T13:13:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उत्तरकार्याच्या दिवशी दु:खातील कुटुंबीयांना बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत पातोंडा-दहिंदुले रस्त्यावरील मातोश्री कॉलनीतील ...

The concept of tree plantation by planting trees for answer | उत्तरकार्यानिमित्त वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

उत्तरकार्यानिमित्त वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उत्तरकार्याच्या दिवशी दु:खातील कुटुंबीयांना बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत पातोंडा-दहिंदुले रस्त्यावरील मातोश्री कॉलनीतील पवार परिवाराने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
मराठा समाजात उत्तरकार्याच्या दिवशी दु:खातील कुटुंबीयांना त्यांचे जवळचे नातेवाईक बाहेर काढून नेतात. त्यात महिलांना बांगडय़ा भरणे, चहा-पाणी व किरकोळ खरेदी करण्यात येते. त्यामुळे त्या कुटुंबाचे दु:ख हलके होते असा उद्देश आहे. परंतु या खर्चिक व वेळ वाया घालवणा:या प्रथेला पवार परिवाराने फाटा दिला. मूळचे दातर्ती, ता.साक्री येथील रहिवासी व सध्या पातोंडा-दहिंदुले रस्त्यावरील मातोश्री कॉलनीत वास्तव्यास असलेल्या गणेश पवार व दिनेश पवार यांच्या आई स्व.मैनाबाई छगन पवार यांचे निधन झाले. गुरुवारी त्यांचा उत्तरकार्याचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी व दु:खातील पवार कुटुंबातील सदस्यांनी बाहेर कुठेही न जाता कॉलनीतील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Web Title: The concept of tree plantation by planting trees for answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.