पावसाळ्यातील कोरडे दिवस वाढवताहेत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:05 PM2018-06-05T13:05:52+5:302018-06-05T13:05:52+5:30

Concerns are growing in dry monsoons | पावसाळ्यातील कोरडे दिवस वाढवताहेत चिंता

पावसाळ्यातील कोरडे दिवस वाढवताहेत चिंता

Next

भूषण रामराजे । 
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 5 : जिल्ह्यात गेल्या वर्षात सरासरी 835 मिलीमीटर पावसाची नोंद होती़ पजर्न्यमानानुसार समाधानकारक असा हा पावसाळा असल्याचे म्हटले जात असले  तरी जून ते सप्टेंबर या काळातील पावसाच्या 122 दिवसांपैकी तब्बल 26 दिवस कोरडे गेले होत़े 2012-13 पासून सातत्याने वाढणारे कोरडे दिवस चिंतेचा विषय ठरत आहेत़  
जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका हा पजर्न्यमानाला बसत आह़े 2012 नंतर सातत्याने पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने शेतीसह भूजल पातळीवर परिणाम होऊन टंचाईयुक्त गावांच्या संख्येत वाढ झाली आह़े 
वातावरणातील बदलांमुळे वाढणा:या कोरडय़ा दिवसांच्या संख्येत गेल्यावर्षी 4 दिवसांनी घट आली असली तरी गत पाच वर्षाच्या तुलनेत इतर दिवशी दीर्घ असा पाऊस न येता चार ते पाच तासाच्या काळात एकाच क्षेत्रात 60 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस होऊन शेतीपिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आह़े पावसाची ही तिव्रता ख:या अर्थाने जिल्ह्यातील शेतक:यांचे चिंतेचे कारण असून कोळदे ता़ नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने तीव्र पावसात शेती पिकांच्या संगोपनाबाबत मार्गर्दर्शन करण्याची तयारी दर्शवण्यात आली आह़े दरवर्षी तिव्र पावसाच्या संकटामुळे येत्या काळात वेगवान पावसापासून संरक्षित शेती संगोपन या विषयावरील मार्गदर्शन शेतक:यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञ आणि पजर्न्यमान तज्ज्ञांकडून व्यक्त झाले आह़े 4जिल्ह्यात पावसाळ्याची सुरुवात सात जून पासून प्रत्यक्षरीत्या होत़े गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात 8 जून 2017 रोजी 103 मिलीमीटर पाऊस झाला होता़ यानंतर 24 जून रोजी 221, 26 जून रोजी 108, 3 जुलै रोजी 178, 4 जुलै 206, 7 जुलै रोजी तब्बल 838 मिलीमीटर पाऊस झाला होता़ यानंतर संपूर्ण जुलै महिन्यात केवळ 22 रोजी 215 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ यानंतर 29 रोजी 199 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आह़ेऑगस्ट महिन्यात 30 ऑगस्ट 189 मिलीमीटर पाऊस वगळता इतर सर्वत्र 40 ते 93 मिलीमीटर दरम्यान पाऊस पडला आह़े ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 15 दिवस पाऊस झालेला नसल्याचे समोर आले आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षात 5 हजार 15 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली होती़ साधारण 835 मिलीमीटर असे या पावसाचे स्वरूप होत़े यात नंदुरबार 644, नवापूर 1 हजार 122, शहादा 686, तळोदा 772, अक्कलकुवा 1 हजार 27 तर धडगाव तालुक्यात 761 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ केंद्रीय हवामान खाते, वेधशाळा आणि द एनर्जी अॅड र्सिोस इन्स्टिटय़ूट (टेरी) या संस्थेकडून जिल्ह्यातील बदलत्या हवामानाबाबत सातत्याने निरीक्षणे नोंदवण्यात आली होती़ यातील टेरीचा अहवाल नुकताच प्रसारित होऊन नंदुरबार जिल्हा तिव्र हवामानबदलाच्या कक्षेत असल्याचे म्हटले आह़े
यात नोंदवल्या गेलेल्या निरीक्षणांमध्ये 2014 च्या पावसाळ्यात 22 दिवस, 2015 च्या पावसाळ्यात 32 दिवस, 2016 च्या पावसाळ्यात 40 दिवस तर गेल्या वर्षातील 2017 च्या पावसाळ्यात 26 दिवस कोरडे गेल्याचे समोर आले होत़े कोरडय़ा दिवसात 1 मिलीमीटरही पाऊस झाला नसल्याची नोंद आह़े
यातही 2016 या वर्षात तब्बल 32 तर गेल्या वर्षी 2017 मध्ये दोन पावसांमध्ये 36 दिवसांचा खंड होता़ 2012 पासून एक पाऊस पडून गेल्यानंतर दुसरा पाऊस येण्याचा खंड हा वाढत आह़े किमान 10 ते 12 दिवसांचा खंड दर वर्षी नोंदवला जात आह़े
पावसांमध्ये वाढलेल्या खंडामुळे शेतक:यांना दुबार, तिबार पेरणीसारख्या संकटांना सामोरे जावे लागत़े यंदाच्या वर्षात या खंडाबाबत विस्तृत अशी टिप्पणी नसली तरी दोन पावसातील वेळ वाढण्याची शक्यता असल्याचे म्हटले आह़े
पावसात वाढत्या अंतरामुळे कोरड क्षेत्र सर्वाधिक प्रभावित होत़े कापूस आणि सोयाबीन या पिकांवर अवेळी पावसाचा सर्वाधिक परिणाम होत असल्याने शेतक:यांचे नुकसान होत़े 

Web Title: Concerns are growing in dry monsoons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.