नंदुरबारमध्ये दंगल, संचारबंदीची स्थिती
By Admin | Published: June 10, 2017 11:40 AM2017-06-10T11:40:18+5:302017-06-10T12:03:15+5:30
दगडफेकीचे लोण वाढू लागल्याने इतर शहरातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 10 -शहरामध्ये गेल्या आठवड्यात मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीमध्ये एका जणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासून तीव्र स्वरुपात उमटून नंदुरबार शहरात दंगल उसळली आहे. तुफान दगडफेक झाल्याने दुकानांचंही नुकसान झालं असून शहरात संचारबंदीसारखी स्थिती आहे. दगडफेकीचे लोण वाढू लागल्याने इतर शहरातून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
गेल्या आठवडय़ात खाद्य पदार्थाच्या गाडीवर किरकोळ कारणावरून वाद झाला होता व त्यातून मारहाणीची घडना घडली होती. त्यानंतर झालेल्या मारहाणीच्या घटनेतील जखमींपैकी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासूनच नंदुरबार शहरात उमटले व मंगळबाजार परिसरात तुफान दगडफेकीला सुरूवात झाली. यात प्रथम दोन दुकानांचे नुकसान झाले.
या वेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या सहा नळकांडय़ा फोडल्या.