कांदा निर्यातबंदीमुळे काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:11 AM2020-09-17T11:11:44+5:302020-09-17T11:11:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कांदा निर्यातबंदी विरोधात काँग्रेसतर्फे नंदुरबार व तळोद्यात आंदोलन करण्यात आले. नंदुरबारात केंद्र शासनाच्या कार्यालयांबाहेर ...

Congress aggressive over onion export ban | कांदा निर्यातबंदीमुळे काँग्रेस आक्रमक

कांदा निर्यातबंदीमुळे काँग्रेस आक्रमक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कांदा निर्यातबंदी विरोधात काँग्रेसतर्फे नंदुरबार व तळोद्यात आंदोलन करण्यात आले. नंदुरबारात केंद्र शासनाच्या कार्यालयांबाहेर आंदोलन झाले. त्या त्या कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना तर तळोद्यात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारने अचानकपणे कांदा निर्यातीवर बंदी आणून राज्यातील कांदा निर्यातीवर मोठा आघात केला आहे. कोरोना महामारीच्या संकटात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रात्रंदिवस एक करून मोठ्या कष्टाने कांदा पिकाचे उत्पादन घेतले. सुदैवाने यंदा उत्पादनही चांगले आले. तीनच महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा व डाळींना जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकºयांना कांद्याची विक्री व निर्यात करणे सोयीचे होणार असे वाटत असतानाच केंद्र शासनाने लगेचच घुमजाव करीत कांदा निर्यातीवर बंदी घालून शेतकºयांवर घोर अन्याय केलेला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकºयांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र शासनाने तात्काळ मागे घेऊन शेतकºयांना न्याय द्यावा.
निर्यात बंदी करणाºया सरकारचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात जमावबंदी आदेश असल्यामुळे आंदोलन न करता केवळ निवेदन देण्यात आले. जर शासनाने निर्यात बंदीचा निर्णय बदलला नाही तर शेतकºयांसोबत रस्त्यावर उतरून काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
नंदुरबारात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, देवाजी चौधरी, रवींद्र कोठारी, खंडेराव पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तळोद्यात प्रांताधिकारी अविशांत पांडा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी व पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Congress aggressive over onion export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.