Vidhan Sabha 2019: काँग्रेसने ऐनवेळी उमेवार बदलल्याने लढतीत आले टि¦स्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:59 AM2019-10-10T11:59:02+5:302019-10-10T12:03:59+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक व्टिस्ट निर्माण होऊन भाजप ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक व्टिस्ट निर्माण होऊन भाजप आमदाराने थेट राजीनामा देत काँग्रेसकडून उमेदवारी मिळविल्याने नंदुरबारची लढत आता रंगतदार ठरली आहे. गेल्या पाच वर्षात एकाच पक्षात सोबत काम केलेले आणि सोबत आमदार राहिलेल्या दोन उमेदवारांमध्ये होणारी ही लढत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे.
नंदुरबार मतदारसंघात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे विरोधक व काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा देत थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील निवडणूक युतीसाठी पर्यायाने डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासाठी सोयीची ठरल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु शहाद्याचे भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांचे तिकीट कापल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लागलीच त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. काँग्रेसने आधी या ठिकाणी दुसरा उमेदवार जाहीर केला होता. त्याऐवजी ऐनवेळी उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे मतदारसंघातील लढत ही रंगतदार ठरली आहे. असे असले तरी उदेसिंग पाडवी यांना हा मतदार संघ पुर्णत: नवीन आहे. त्यांचा फारसा संपर्क देखील या भागात नाही. त्यामुळे त्यांना मेहनत घ्यावी लागत आहे.
डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दीपा वळवी, स्वाभिमानीचे अॅड. प्रकाश गांगुर्डे आणि बसपाचे विपूल वसावे हे देखील रिंगणात आहेत. काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी असतांनाही त्यांच्या उमेदवाराने या ठिकाणी माघार घेतलेली नाही. डॉ.विजयकुमार गावीत हे गेल्या 25 वर्षापासून या भागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे त्या कामांच्या जोरावर त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तर भाजपच्या नाराज गटातील, रघुवंशींसोबत न गेलेले कार्यकत्र्याना घेवून उदेसिंग पाडवी देखील प्रचाराला लागले आहेत. वंचीतनेही आपल्या प्रभाव क्षेत्रात प्रचार सुरू केला आहे.
तापी-बुराई उपसा योजनेचे कामाला गती देण्यात आली, येत्या पंचवार्षीकमध्ये हे काम पुर्ण करण्याचा मनोदय.
तापीवरील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करून आणत त्या कामांना सुरुवात.
वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा नव्याने मंजुर करून पुढील वर्षापासून ते कार्यान्वीत करण्याचा संकल्प.
खासदारांच्या माध्यमातून नंदुरबारला जोडणा:या सहा महामार्गाना मंजुरी.
येत्या काळात नंदुरबारची एमआयडीसी कार्यान्वीत करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प.
25 वर्षापासून प्रतिनिधीत्व करीत असतांनाही एमआयडीचा प्रश्न सुटू शकला नाही. एकही उद्योग येवू शकला नाही.
चिली पार्कचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कुठल्याही कामाची सुरुवात नाही.
सरकारने शेतक:यांची कजर्माफी केली, परंतु अनेक शेतकरी अद्यापही त्यापासून वंचीत असल्याचा मुद्दा.
तापीवरील उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत.
लढतीतील सहा उमेदवार व त्यांचे पक्ष
विजयकुमार कृष्णराव गावीत (भाजप), उदेसिंग कोचरू पाडवी (काँग्रेस), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी पक्ष), दीपा वळवी (वंचीत बहुजन आघाडी), विपूल वसावे (बहुजन समाज पार्टी), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष)