Vidhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांना काँग्रेसचे तिकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:56 PM2019-10-04T12:56:20+5:302019-10-04T12:56:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहादा विधानसभा मतदार संघातून ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने कमालीचे नाराज असलेले विद्यमान आमदार उदेसिंग ...

Congress ticket to Uday Singh Padvi | Vidhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांना काँग्रेसचे तिकिट

Vidhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांना काँग्रेसचे तिकिट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहादा विधानसभा मतदार संघातून ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने कमालीचे नाराज असलेले विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आह़े काँग्रेसने नंदुरबार मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली असून आमदार पाडवी हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत़ 
शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुन्हा उमेदवारी मागितली होती. पक्षाने त्यांना कामाला लागण्याचेदेखील सूचित केले होते. ते पक्षाच्या निवडणूक पूर्व सव्रेक्षणात डबल ए प्लस मध्ये होते. यामुळे त्यांचे तिकीट पक्के समजले जात होते. परंतु ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून त्यांचे पूत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. अर्थात त्यांच्या पुत्रास तिकीट देण्यात आले असले तरी त्यांना विश्वासात घेण्यात न आल्याने ते नाराज झाले होत़े या घडामोडीच्या पाश्र्वभूमिवर आमदार उदेसिंग पाडवी यांनी मंगळवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली होती. त्यांनी ‘वेट अॅण्ड वॉचचा’ सल्ला दिला होता.  परंतु ऐनवेळी पक्षाने त्यांना डावलल्याची सल त्यांच्या मनात खदखदत होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा पर्यायदेखील पुढे ठेवला होता. त्यातच त्यांनी धडगावचे आमदार के.सी. पाडवी यांच्याशी काँग्रेसच्या पर्यायाबाबत संवाद साधल्याचेही बोलले जात होत़े यातून ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती़ या चर्चेला काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री जाहिर केलेल्या उमेदवारीतून पूर्णविराम दिला आह़े दरम्यान या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी  आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी व काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना होत असल्याचेही सांगितले होत़े  त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपाला निश्चितच धक्का बसणार आहे. गुरुवारी ते अर्ज दाखल करणार असल्याने नंदुरबार मतदारसंघात रंगत वाढणार आह़े 


 पक्षाच्या निवडणूक पूर्व सव्रेक्षणात मी डबल ए प्लसमध्ये होतो. मला कामाला लागण्याची सूचनादेखील वरिष्ठांनी दिली होती. असे असतांना जिल्ह्यातील पक्षाच्या काही पदाधिका:यांच्या षडयंत्रामुळे ऐनवेळी माङो तिकीट कापण्यात आले. शिवाय दुस:याला तिकीट देतांनादेखील साधे विश्वासात घेण्यात आले नाही. तसेच एकनाथराव खडसेंचेही तिकीट नाकारण्यात आले असल्यामुळे मी निषेध म्हणून पक्षाचा राजीनामा देत असून, काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने नंदुरबार विधानसभेसाठी उमेदवारी दिली तर निश्चितच तेथे लढणार असून, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिका:यांशी चर्चा कली आह़े .     
                        -उदेसिंग पाडवी, आमदार, शहादा
 

Web Title: Congress ticket to Uday Singh Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.