नंदुरबार तालुक्यातील लघुप्रकल्पांमध्येही ठणठणाट, रंब्बी हंगामावर संक्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:58 PM2017-11-17T12:58:39+5:302017-11-17T12:58:51+5:30
Next
ल कमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : गाव व परिसराला वरदान ठरणा:या शनिमांडळ व ठाणेपाडा लघुप्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ त्यामुळे शनिमांडळसह लगतच्या परिसरात रब्बी व उन्हाळी हंगाम विहिरीतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार जेमतेम येण्याची चिन्हे आहेत़ यंदा नेहमीप्रमाणे तालुक्यातील पूर्व भागात जेमतेमच पाऊस झाला़ त्यामुळे शेतक:यांना खरिप हंगाम घेतानाही पाण्याअभावी अनेक अडचणी आल्या होत्या़ एक दोन दमदार पावसाने परिसरातील नद्या, नाले ब:यापैकी वाहू लागले होत़े परंतु नंतर पावसाने पाठ फिरविल्याने पुन्हा पाण्याची ओरड सुरु झाली होती़ पावसाचा लहरीपणामुळे पाण्याअभावी शेतक:यांना खरिप हंगामातील पिक जगविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता़ समाधानकारक पाऊस नसल्याने साहजिकच येथील लघुप्रकल्पांमध्येही ठणठणाट होता़ शेतांमधील विहिरींची पाणीपातळीदेखील कमालीची घटली होती़भर पावसाळ्यातच विहिरींची पाणीपातळी खालावली असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत होती़ परंतु त्या वेळी शेतक:यांनी कापूस, कांदा आदी पिके जशीतशी घेतली़ परंतु आता पाणीपातळीत अधिक घट झाल्याने रब्बीतील गहु, हरभरा आदी पिक येण्याची आशा धुसर झाली आह़े त्यातच कांदा, उन्हाळी भुईमूग, बाजरी आदी पिक घेणे अशक्य ठरणार आह़े दोन्ही प्रकल्पांमध्ये ठणठणाट़़ठोणेपाडा शिवारातील तांबेबारा धरण व शनिमांडळ गावानजीक असणारे ब्रिटीशकालीन धरण हे दोन्हीही धरणात असणारे अल्पजलसाठा बागायतीसाठी सोडण्यात येणार नाही़ जेमतेम एक चतुर्थाश पाणीसाठी असल्याने शनिमांडळ येथील धरणातील पाण्याचा गावाला पाणीपुरवठा अधून मधून सोडण्यात येणार आह़े धरण परिसरात गाव विहिरी असल्याने गावासाठी त्या पाण्याचा उपयोग होणार आह़े मात्र शेतीसाठी यंदा पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी व उन्हाळी हंगामासठी शेतक:यांना यंदा मुकावे लागणार आह़े या धरणांचे पाणी सोडण्यात आल्यास गाव व परिसरातील विहिरीतील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत असत़े मात्र तशी स्थिती यंदा असणार नसल्याने बहुसंख्य विहिरीवर परिणाम होणार असल्याने हंगाम जिकीरीचा ठरणार आह़े बागायतीवर होणार परिणाम़़दिवाळीनंतर गहु, हरभरा पेरणीस कमालीचा वेग येतो़ मात्र यंदा तसे चित्र अभावानेच दिसून येत असल्याची स्थिती आह़े उपलब्ध पाण्याने किमान रब्बी हंगाम तरी येतो की नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी वर्गात संभ्रमावस्था दिसून येत आह़े तसेच अद्याप पाहिजे त्या प्रमाणात थंडीही पडत नसल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त होत आह़े पूर्व भागात अद्याप थंडीची चाहूल लागली नसल्याने शेतकरी गहु व हरभरा पेरणीसाठी अद्याप धजावत नसल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े