नंदुरबारात विविध ठिकाणी दशामातेची विधीवत स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:18 PM2018-08-12T13:18:22+5:302018-08-12T13:18:27+5:30

भाविकांमध्ये संचारला उत्साह : दहा दिवस होणार मनोभावी सेवा

Constitutional establishment of Dashmata in different places in Nandurbar | नंदुरबारात विविध ठिकाणी दशामातेची विधीवत स्थापना

नंदुरबारात विविध ठिकाणी दशामातेची विधीवत स्थापना

Next

नंदुरबार : शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी दशामातेची विधिवत स्थापना करण्यात आली़ या वेळी मातेच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आल़े
गुजरात राज्यात दशामातेची मोठय़ा उत्साहात स्थापना करण्यात येत असत़े गेल्या काही वर्षापासून नंदुरबारातसुध्दा दशामाता उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येत आह़े दहा दिवस दशामातेची मनोभावे सेवा करण्यात येत असत़े तसेच पूर्जाअर्चा करण्यात येत असत़े दहाही दिवस मातेला रोज नवनवीन प्रसादांचा भोग चढविण्यात येत असतो़ त्याच सोबत दशामाता पोथींचे महिलाकडून वाचन करण्यात येत असत़े नंदुरबारात घरोघरी दशामाता विराजमान झालेल्या आहेत़ महिलांकडून रात्री उशिरार्पयत जागरण करण्यात येत असत़े रात्री विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असत़े 
भाविकांचा उत्साह कायम
नंदुरबार जिल्हा गुजरात लगत असल्याने गेल्या काही वर्षापासून नंदुरबारातसुध्दा दशामाता उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात येत आह़े 
यामध्ये महिला भाविकांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो़ शनिवारी नंदुरबार शहरासह जिल्हाभरात दशामातेची विधीवत स्थापना करण्यात आली़ सकाळी ग्रामीण भागातून दशामातेची मूर्ती घेण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक दाखल झालेले दिसून आलेत़ नंदुरबार शहरातील प्रमुख मुर्तीकारांकडून दशामातेची मूर्ती घेऊन जाताना अनेक भाविक नजरेस पडत होत़े मोठ-मोठय़ा मूर्ती घेऊन जाण्यासाठी भाविकांनी सजवलेली वाहने आणलेली होती़  वाजत गाजत व भक्तीमय वातावरणात मातेला घेऊन जाण्यात भाविक तल्लीन झालेले दिसून आलेत़ 
नंदुरबारसह गुजरातमधील निझर, वेळदा, कुकरमुंडा येथे तसेच शहादा, तळोदा व धुळे आणि जळगाव येथेही आता दशामाता उत्सव साजरा करण्यात येत आह़े गेल्या काही वर्षापासून या उत्सवाला आता सार्वजनिक रुप येण्यास सुरुवात झालेली आहेत़ त्यामुळे साहजिकच भाविकांचा उत्साहसुध्दा यातून वाढलेला दिसून येत आहेत़
दहा दिवस उत्साहाचे वातावरण
दशामातेचा उत्सव दहा दिवस चालत असतो़ या दहाही दिवस महिलांकडून रोज सकाळ व सायंकाळ दशामाता पोथीचे वाचन करण्यात येत असत़े तसेच ज्यांच्या घरी दशामातेची स्थापना झालेली आहे, अशांकडे परिसरातील नागरिक दर्शनासाठी जात असतात़ संपूर्ण घर आकर्षक पध्दतीने सजविण्यात आलेले असत़े
या वेळी महिलांकडून ओटी भरणे तसेच हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही घेण्यात येत असतो़ दशामाता उत्सवाचे सर्वाधिक आकर्षण महिला भाविकांमध्ये दिसून येत असत़े पुढील दहा दिवस भाविकांमध्ये असाच उत्साह कायम राहणार आह़े
 

Web Title: Constitutional establishment of Dashmata in different places in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.