नंदुरबार जिल्ह्यात महिला रूग्णालयाचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:54 AM2017-11-13T11:54:15+5:302017-11-13T11:54:48+5:30
नवजात अर्भक केंद्रही लांबले : कोटय़ावधींचा निधी मंजूर होऊन विलंब
ठळक मुद्देमंदाणे रूग्णालय कागदावरचशहादा तालुक्यातील मंदाणे येथे ग्रामीण रूग्णालयाला मान्यता मिळाल्यानंतर जमिन हस्तांतरणाबाबत कामकाज पूर्ण झाले आह़े मात्र इमारत बांधकामासाठी शासनाने निधीच न दिल्याने हे रूग्णालय कागदावर आह़े मंदाणे शिवारातील गट क्रमांक 492 मध्ये दोन हेक्टर जमिन उभारण्यात ये
न दुरबार : जिल्ह्यात महिलांसाठी 100 खाटांचे दोन महिला रूग्णालय आणि शहादा तालुक्यात मंदाणे येथे 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय निर्मिती करण्याची घोषणा शासनाने गेल्या वर्षात केली होती़ 2009 पासून प्रस्तावित असलेल्या या रूग्णालयांचे काम अद्यापही अपूर्ण आह़े 11 ग्रामीण रूग्णालय, दोन उपजिल्हा, एक सामान्य रूग्णालय असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी शासनाने धडगाव आणि नंदुरबार येथे महिला रूग्णालय आणि मंदाणे येथे ग्रामीण रूग्णालय उभारण्याची घोषणा करून बांधकामासाठी निधी मंजूर केला होता़ या निधीनंतर गेल्यावर्षात महिला रूग्णालयाच्या कामाला सुरूवात झाली होती़ मात्र त्यानंतर हे काम सातत्याने रखडल्याने अद्यापही किमान दोन वर्षे काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत़ तर दुसकीकडे मंदाणे येथे उभारण्यात येणा:या ग्रामीण रूग्णालयासाठीच्या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार येथील महिला आणि मंदाणे येथील रूग्णालयांसाठी पदांची निर्मिती करण्यात आली आह़े मात्र पदभरती नसल्याने या रूग्णालयातून सेवा कधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आह़े तिन्ही ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करून त्यांना निधी वर्ग करण्यात येऊनही बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून आले आह़े