विजेच्या कमीअधीक दाबाने ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:56 PM2019-08-22T12:56:20+5:302019-08-22T12:56:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : परिसरात वीज वितरण कंपनीची वीज तास्न तास बंद होत असून, वीजपुरवठा कमी अधिक दाबाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : परिसरात वीज वितरण कंपनीची वीज तास्न तास बंद होत असून, वीजपुरवठा कमी अधिक दाबाने होत असल्याने नागरिकांचे घरगुती साहित्यासह टी.व्ही. संच, पंखे व बँकेतील संगणक जळण्यासाखरे उपकरण जळण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधीत वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिनाभरापासून अनियमित वीजपुरवठा होत असून, या वेळी कमी अधीक दाबाने होणा:या वीजपुरवठय़ामुळे सेंट्रल बँकेतील संगणकात वेळोवेळी बिघाड होत असल्याने दैनंदिन व्यवहार थप्प झाले आहे. त्यामुळे ग्राहक व कर्मचा:यांमध्ये वाद होत असून, याबाबत बँकेने तळोदा वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता सचिन काळे यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
प्रतापपूर गावाजवळच वीजवितरण कंपनीचे 33/11 के.व्ही.चे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून सातपुडय़ातील पर्वत रांगेत 15 ते 20 अंतरावरील गावात वीजपुरवठा करण्यात आला असून, याठिकाणी तासन् तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या खंडीत वीजपुरवठय़ामुळे शेतक:यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, प्रतापपूर येथील उपकेंद्रातील दूरध्वनी संच गेल्या महिनाभरापासून चोरीस गेल्याने नागरिकांना वीज समस्यांबाबत संपर्क करणे अवघड झाले आहे. दरम्यान वीज पुरवठय़ात बिघाड झाल्यास संबंधीत वायरमनशी संपर्क साधल्यास ते सदरील क्षेत्र आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रात नियमित संतती नियमनचे ऑपरेशन होत असतात. मात्र अनेकदा वीजपुरवठय़ाअभावी ऑपरेन्स रद्द करण्यात आले आहेत.
हे गाव पाच हजार लोकवसाहतीचे असून, परिसरातील नागरिकांना विविध कामासाठी याठिकाणी यावे लागत असल्याने येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या उपकेंद्रापासूनच प्रतापपूरसाठी स्वतंत्र फीडर कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच रोहिदास पावरा यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.