विकासात योगदान देणा:या सरपंचांना वाढीव मानधन द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:47 PM2018-11-28T13:47:54+5:302018-11-28T13:48:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरपंचांच्या प्रयत्नांनी ग्रामीण विकासाला चालना मिळते, परंतू त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने कामाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरपंचांच्या प्रयत्नांनी ग्रामीण विकासाला चालना मिळते, परंतू त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने कामाला मर्यादा आल्या आहेत़ यासाठी सरपंचांना मानधन वाढीचा सन्मान देण्याचा सूर सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला़ जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम पार पडला़
पंचायत राज विकास मंच आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नंदुरबार शाखेकडून याहामोगी सभागृहात हा मेळावा घेण्यात आला़ प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुडरूकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पुणे जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष सतीष जगताप, नाशिक विभागीय अध्यक्ष देवमन पवार, जिल्हाध्यक्ष राहुल गावीत, जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष आमशा पाडवी, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा, याहामोगी माता, बिरसा मुंडा आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला़
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राहुल गावीत यांनी केल़े
मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी म्हणाले की, देशातील इतर कोणत्याही भागापेक्षा महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम आह़े यातून विकासाचा वेग वाढला आह़े मेळावे आणि कार्यशाळांना पदाधिका:यांनी हजेरी लावलीच पाहिज़े यातून विचारांचे आदानप्रदान होऊन विकासाचा वेग वाढणार आह़े जिल्ह्यात पेसामुळे येथील ग्रामविकासाचा वेग वाढला आह़े पंचायातींनी ग्रामसभांसोबतच वॉर्डसभा घेतल्यास शेवटच्या ग्रामस्थालाही योजना कळतील़
भरत गावीत यांनी, सरपंच हा ग्रामीण विकासाचा आत्मा आह़े पेसांतर्गत ग्रामपंचायतींना वाढीव निधी मिळत असल्याने त्या स्वयंभू झाल्या आहेत़ अनेक पंचायतींनी विकासात्मक कामे करुन कृती आराखडा सार्थ ठरवला आह़े अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे सरपंचांच्या ज्ञानात भर पडल़े यातून विकास कामांना चालना मिळून फसवणूक होण्याचे प्रकारही होणार नाहीत़ सरपंचांनी तंटामुक्ती आणि दारुबंदीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितल़े
जयंत पाटील यांनी, सरपंच हा गावाचा प्रमुख असतो, साध्याभोळ्या माणसाकडून ग्रामपंचायत चालवणे शक्यच नाही, यासाठी सक्षम माणसेच लागतात़ असा सक्षम माणूस घडवण्यासाठी सरपंच परिषद महाराष्ट्रभर कार्य करत आह़े सरपंचांचा सन्मान व्हावा हा प्रमुख मुद्दा आह़े यासाठी राज्यातील सर्वच सरपंचांचे मानधन वाढावे म्हणून सातत्याने परिश्रम घेत आह़े येत्या दोन महिन्यात होणा:या राज्याधिवेशनात याबाबत ठराव करुन मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि लोकप्रतिनिधींना देणार असल्याचे त्यांनी सांगितल़े