कॉपीची ङोरॉक्स काढणा:या चौघांविरुद्ध शहाद्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:28 PM2018-03-10T12:28:12+5:302018-03-10T12:28:12+5:30

Copying the phony: The four-faced crime in Shahada | कॉपीची ङोरॉक्स काढणा:या चौघांविरुद्ध शहाद्यात गुन्हा

कॉपीची ङोरॉक्स काढणा:या चौघांविरुद्ध शहाद्यात गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावीचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तरे ङोरॉक्स करून ते वितरीत केल्याप्रकरणी शहादा येथील एका ङोरॉक्स सेंटर चालकासह चौघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ङोरॉक्स सेंटर चालकांवर कारवाईची ही पहिलीच घटना     आहे. 
दहावीच्या परीक्षेत कॉपीची ङोरॉक्स करून ते वितरीत करण्याचे प्रकार अक्कलकुवा येथे उघडकीस आले होते. ही बाब लक्षात घेता इंग्रजीच्या पेपरला शहादा पोलिसांनी ङोरॉक्स सेंटरवर पाळत ठेवली होती. पुरुषोत्तम मार्केटमधील कल्पे ङोरॉक्स मध्ये कॉपीची ङोरॉक्स खुलेआम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली असता इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दोन ते सातच्या उत्तराच्या 20 प्रती याशिवाय इतर उपप्रश्नांच्या 11 प्रती ङोरॉक्स केलेल्या आढळून आल्या. ङोरॉक्स चालक राजेंद्र दिलीप भावसार रा.जुनीमढी, शहादा, कॉपीची ङोरॉक्स घेण्यासाठी आलेले राजेश आनंदराव पाटील रा.अनरद, सचिन रघुनाथ चौधरी, गुजरगल्ली, शहादा व महेंद्र दामू  पटेल, कुकडेल, शहादा यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ङोरॉक्स मशीन देखील ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस नाईक दिपक वामन भोई यांनी फिर्याद दिली. तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व फौजदार ए.के.नेरकर करीत आहे.
अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्यामुळे ङोरॉक्स चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Copying the phony: The four-faced crime in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.