नंदुरबारला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:00 PM2020-07-19T12:00:34+5:302020-07-19T12:00:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर वाढतच चालला आहे. जेवढ्या स्वॅब चाचण्या वाढत आहे तसे मृत्यूसंख्या देखील ...

Corona to Nandurbar | नंदुरबारला कोरोनाचा विळखा

नंदुरबारला कोरोनाचा विळखा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर वाढतच चालला आहे. जेवढ्या स्वॅब चाचण्या वाढत आहे तसे मृत्यूसंख्या देखील वाढली आहे. नंदुरबार शहराला कोरोनाचा विळखा पडला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मृत्यूसंख्या आठ होती ती आता १७ झाली आहे. सध्या कोरोनामृत्यूदर हा ५.२१ वर पोहचला आहे. जो राज्यापेक्षा अधीक असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर वाढला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून त्यात वाढ होत गेली आहे. मध्यंतरी स्वॅब घेण्याचे प्रमाण कमी आणि स्वॅब अहवाल येण्याचे प्रमाण देखील कमी असल्यामुळे संख्या स्थिरावली होती. नंतर मात्र स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढले, स्थानिक ठिकाणी चाचणी घेता येऊ लागली त्यानंतर रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे.
७ जुलै रोजी २०० पर्यंत असलेली रुग्ण संख्या अवघ्या १० दिवसात ३२८ पर्यंत पोहचली आहे. या दहा दिवसात मृत्यूची संख्या देखील आठ ने वाढली आहे. यामध्ये मृत्यू झालेले सर्वाधिक हे ६० वर्ष वयापुढील होते.
विळखा वाढतोय
जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या ८४ रुग्णांमध्ये ७० पेक्षा अधीक रुग्ण हे एकट्या नंदुरबार शहरातील आहेत. शिवाय मृत्यू झालेले देखील सर्वाधिक हे नंदुरबार शहरातील आहेत. त्यामुळे नंदुरबार सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदुरबार खालोखाल शहादा येथे रुग्ण संख्या वाढत आहे. सध्या शहादा शहर व तालुक्यातील ३१ जण उपचार घेत आहेत. तळोद्यातील स्थिती आता आटोक्यात येऊ लागली आहे.
मृत्यूदर वाढला
जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर वाढत चालला आहे. सध्या तो ५.२१ पर्यंत आहे. जिल्ह्यात एकुण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दहा दिवसात आठ जणांची त्यात वाढ झाली आहे.
मयतांमध्ये वृद्ध रुग्णांचे प्रमाण अधीक आहे. १७ पैकी १२ रुग्ण हे ६० वर्ष वयापेक्षा अधीक आहेत. यापैकी अनेकांना विविध आजार होते तर काही जणांचा आधी मृत्यू झाला, नंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
बरे होण्याचे प्रमाणही चांगले
जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील बºयापैकी आहे. ५९.४५ टक्के इतके आहे. एकुण ३२८ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यापैकी १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय तीन हजारापेक्षा अधीक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सिव्हिलमधील कोविड कक्ष आणि खामगाव रस्त्यावरील कोविड कक्षात सध्या रुग्णांवर उपचार केला जात आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगले असल्याचे चित्र आहे.


४कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वाढते मृत्यू पहाता नागरिकांमधील भिती वाढली आहे. असे असली विनाकारण फिरणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टिन्सिंग न ठेवणे असले प्रकार सर्रास सुरूच आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने पुन्हा कडक निर्णय घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात थेट गुन्हे दाखल करणे किंवा जागेवरच दंडात्मक कारवाई करण्याचे जे प्रमाण होते ते आता शिथील झाले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच कारवाईबाबत कडक धोरण अवलंबवले पाहिजे अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Corona to Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.