कोरोना प्रतिबंध सर्वेक्षण रासेयो स्वयंसेवक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:24 PM2020-04-16T12:24:43+5:302020-04-16T12:30:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : पालिकेच्या कारोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या ...

Corona Prevention Survey Rescue Volunteer Participants | कोरोना प्रतिबंध सर्वेक्षण रासेयो स्वयंसेवक सहभागी

कोरोना प्रतिबंध सर्वेक्षण रासेयो स्वयंसेवक सहभागी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : पालिकेच्या कारोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षणात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेउन सर्वेक्षण सुरु केले आहे.
नवापुर प्पालिकेच्या कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षणात वरिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवकांची मदत होऊ शकते असे संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांनी सुचविले. यानुसार रासेयो समन्वयक डॉ. छाया गावीत व त्यांच्या चमूने सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतील अशा स्वयंसेवकांची यादी तयार केली. नगराध्यक्षा हेमलता पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी यांच्याशी चर्चा करून स्वयंसेवकांना नंदकुमार वाळेकर व डॉ. कोकणी यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात कोरोना विषाणू संदर्भात माहिती देउन सर्वेक्षण दरम्यानच्या प्रश्नावली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, सॅनीटायझरचा वारंवार उपयोग आदी बाबतीत जनजागृती करण्यासाठी मागर्दर्शन करण्यात आले. लॉक डाऊनच्या काळात सर्वेक्षणासाठी पुढे येऊन स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य हाती घेतल्याबद्दल आमदार शिरीष नाईक, प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल व उपप्राचार्य तथा शिक्षक व शिक्षकेतर यांनी समाधान व्यक्त केले. नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, अजय पाटील, अमृत लोहार, मुख्याधिकारी राजेंद्र नजन, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, मिलिंद भामरे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी नवापूर शहरात आरोग्य तपासणी कामी माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले. नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याचे पालिकेने कळवले आहे़

राष्ट्रीय सेवा योजनेचे ३० स्वयंसेवक विद्यार्थी व प्रा. डॉ. छाया गावीत यांना पालिका मुख्यधिकारी राजेंद्र नजन यांनी योग्य त्या सुचना देऊन विद्यार्थ्यांना हात मोजे, मास्क व सॅनेटाझर उपलब्ध करुन दिले आहेत़

Web Title: Corona Prevention Survey Rescue Volunteer Participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.