‘कोरोना बराच होतो फक्त रुग्णाने सकारात्मक रहावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:18 PM2020-10-01T12:18:35+5:302020-10-01T12:18:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे़ रुग्ण बरे होण्याच्या या टक्केवारीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे़ रुग्ण बरे होण्याच्या या टक्केवारीत डॉक्टर्स, परिचारिका, परिचर यांचा मोठा वाटा आहे़ यातही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बजावलेली सेवा ही वेगळेपण ठरत आहे़ येथे काम करणाºया काही महिला डॉक्टरांसोबत संवाद साधला असता, कोरोना बरा होतो, रुग्णाने केवळ सकारात्मक रहावे असाच सल्ला दिला़
महिला डॉक्टरांनी प्रत्यक्ष वॉर्ड, पीपीई कीटमधील वावरणे याबाबत अनुभव कथन करत रुग्ण कसे बरे होवू शकतात हेही पटवून दिले़ चार महिन्यात १४० बेडची सुविधा निर्माण होण्याच्या प्रवासाच्या या डॉक्टर्स आणि परिचारिक साक्षीदार आहेत़ कोरोनाचा सुरूवातीपासून आढावा या महिला डॉक्टर्सने मांडून रुग्णसेवेत वेळोवेळी होत गेलेले बदलही त्यांनी सांगितले़ आजघडीस ९२ परिचारिक आणि १६ महिला वैद्यकीय अधिकारी येथे काम करत आहेत़
सात दिवस ड्यूटी आणि सात दिवस क्वारंटाईन राहून घराकडे परतणाºया या हिरकणी पुन्हा कधी परत येणार याचा हिशोब मांडूनच आवारातून बाहेर पडतात हेही त्यांनी शेवटी सांगितले़
- या संवादादरम्यान डॉ़ वंदना पाटील यांनी अनुभव सांगितला़ ड्यूटीवर असताना रात्रीच्या अडीच वाजता एका ७० वर्षीय रुग्णाची आॅक्सिजन लेव्हल पूर्णपणे खालावून तो गंभीर झाला़ अशा वेळी काय करावे म्हणून त्यांनी वरिष्ठांना कळवले़ परंतु वेळ कमी असल्याने मग त्यांनीच रुग्णाला इंजेक्शन दिले आणि सलाईन लावून उपचार सुरू ठेवले़ दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची प्रकृती सुधारत गेली़ अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून हा रुग्ण बाहेर आला़ अन् चार दिवसात बरा होवून घरीही गेला़ केवळ सकारात्मक विचार ठेवत उपचार दिल्याने हा रुग्ण बरा झाल्याचे डॉ़ पाटील यांनी सांगितले़ हा एकप्रकारे चमत्कार होता असेही त्या म्हणाल्या़
कोरोनाबाधितांना मानसिक आधाराची मोठी गरज असते़ वॉर्डमधील यंत्रांचा आवाज, श्वास घ्यायला होणारा त्रास असलेले रुग्ण अशा वातावरणात काम करणे कठीण असते़ त्यात अंगावर असलेले पीपीई कीट सलग १२ तास घालणे मोठे दिव्यच, परंतु आपल्यात पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तरच समोरचा बरा होईल या विश्वासाने काम करत राहिले़ कुटूंबापासून लांब राहून ही सेवा देणे अवघड असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने आपण चांगले काम केले असल्याचे समाधान वाटते़
-डॉ़ वंदना पाटील, वैद्यकीय अधिकारी, सिव्हील, नंदुरबाऱ
प्रारंभी अडचणी येत होत्या़ कालांतराने सूसूत्रता आली़ आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे़ प्रत्येक बेडपर्यंत परिचारिक व डॉक्टर्स ड्यूटीच्यावेळी सजगपणे लक्ष देत आहेत़ पीपीई कीटमध्ये एप्रिल ते जून पर्यंत येणारा घाम, लागणारी पाण्याची तहान खूप हैराण करणारी होती़ महिलांसाठी हे खूप अडचणीचे होते़ परंतु आता सवय झाली आहे़
-डॉ़ रेचेल वळवी, वैद्यकीय अधिकाी, कोविड रुग्णालय, नंदुरबाऱ
तीन वर्षाचा मुलगा घरी कुटूंबासोबत राहत असताना कोविड कक्षात ड्यूटी केली़ १२ तास पीपीई कीट घालून सेवा दिली आहे़ सहा तास आयसीयूमध्ये ड्यूटी करणे अतिशय अवघड़ एखाद्या महिलेने एवढा वेळ पीपीई घालून काम करणे जवळजवळ अशक्यच आहे़ परंतु रुग्णसंख्या अधिक असल्याने रात्र आणि दिवस अशा दोन्ही शिफ्टमध्ये काम केले़ प्रारंभी सगळच नवीन होते़ परंतु डॉ़ वसावे, डॉ़ सातपुते यांच्या मार्गदर्शनात रुग्णांची प्रत्येक बाब बारकाईने समजून घेत उपचार कसा करावा याचीही माहिती घेतली़ यातून खूप काही शिकायला मिळाले़
-ड़ॉ़ वर्षा सुळे, वैद्यकीय अधिकारी, सिव्हील, नंदुरबाऱ