कोरोना : अक्कलकुवा येथे दोन तर शहाद्यात पुन्हा एक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:48 AM2020-04-25T11:48:54+5:302020-04-25T11:50:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथे दोन तर शहादा येथे एक अशा तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथे दोन तर शहादा येथे एक अशा तिघांचा कोरोनाचा अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्याची देखील आता रेडझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान, शहादा येथील एका रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील 66 जणांचे अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाले. त्यापैकी 3 अहवाल पॉङिाटिव्ह तर 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉङिाटिव्ह तीन जणांमध्ये अक्कलकुवा येथील दोन्ही महिला आहेत. एक 23 तर दुसरी 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर तिसरा 48 वर्षीय रुग्ण शहादा येथे आढळून आला आहे. हे तिन्ही रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या परिसरात राहणारे असून त्यांच्याशी संपर्क आलेले आहेत. यापूर्वीच त्यांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे.
जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा आता रेडझोनकडे वाटचाल करू लागला आहे. यामुळे जिल्ह्यात उपाययोजनांना गती आली आहे.