शहरातील कोरोनाबाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:34 PM2020-07-17T12:34:11+5:302020-07-17T12:34:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली असून गुरुवारी दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली असून गुरुवारी दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ यामुळे जिल्ह्यातील मयतांची संख्याही १६ तर बाधितांची संख्या ३२२ झाली आहे़
शहरातील मुजावर मोहल्ला भागातील ६५ वर्षीय व शहादा येथील कुंभारगल्लीतील ७५ वर्षीय पुरूष अशा दोघाचे अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आले होते़ दरम्यान सायंकाळी प्राप्त अहवालात शहादा शहरातील पतंजली नगरातील दोन, नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा भागात ३, चौधरी गल्ली व देसाईपुरा प्रत्येकी तर गुरुनानक सोसायटी येथील एक अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ यातील गुरूनानक सोसायटीतील ७२ वर्षीय बाधिताला कोविड कक्षात बुधवारी रात्री दाखल करण्यात आले होते़ त्याचा गुरुवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे़ बुधवारी रात्री गवळीवाडा, वृंदावन कॉलनी आणि खंडेराव पार्क येथे प्रत्येकी एक असे तीन रुग्ण आढळून आले होते़
सध्यस्थितीत कोविड कक्षात ११२ जण उपचार घेत आहेत़ जिल्ह्यातून आतापर्यंत १८४ रुग्ण बरे होवून घरी परत गेले आहेत़ जिल्ह्यात आजअखेरीस सर्वाधिक २१६ कोरोनाबाधित रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात, शहादा ६५, तळोदा २०, नवापूर ५, अक्कलकुवा १५ तर धडगाव तालुक्यात १ रुग्ण आजअखेरीस आढळून आला आहे़
गुरुवार सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाने २ हजार ६७० जणांचे स्वॅब तपासले आहेत़ अद्याप ७६ जणांचे रिपोर्ट प्रलंबित असून सर्वाधिक ५६ स्वॅब हे नंदुरबारातील आहेत़