जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण जगतोय सर्वसामान्य जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:40 PM2020-12-12T12:40:58+5:302020-12-12T12:41:07+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण समोर आला होता. त्याच्यासोबत कुटूंबातील तिघांनाही कोरोनाची ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण समोर आला होता. त्याच्यासोबत कुटूंबातील तिघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तब्बल २४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मे महिन्यात घरी गेलेला हा रुग्ण आणि त्याचे कुटूंब आजघडीस सर्वसामान्य जीवन जगत असून या काळात रुग्णालय प्रशासनाने केलेल्या योग्य उपचारांमुळे आपण कोरोनातून बाहेर आल्याचे ते सांगत आहेत.
जिल्ह्यात आजघडीस कोरोना संसर्ग झालेले एकूण ६ हजार ८०० रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ हजार २३३ जण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात आज रुग्णांची संख्या मोठी असली तरी एप्रिलपूर्वी एकही रुग्ण जिल्ह्यात नव्हता. १८ एप्रिल रोजी प्रथम कोरोनाबाधित नंदुरबार शहरात आढळून आला होता. बाधिताच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला होता. संबधित रुग्णासोबत त्याच्या कुटूंबातील आई, मुलगा व मुलगी असे तिघेही बाधित असल्याचे समोर आल्यानंतर चाैघांना जिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात आले. उपचाराच्या आठ महिन्यानंतर हे सर्व आज सामान्य जीवन जगत असून दैनंदिन कामे उत्साहाने करत आहेत. कोरोनापासून केवळ स्वत:ची काळजी हा एकमेव गुण वाचवू शकतो असे ते आता सर्वांना सांगत आहेत. पहिला रूग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कसे झाले
नंदुरबार शहरातील दाट लोकवस्तीत राहणारे ५५ वर्षीय व्यक्ती छातीतील कफ आणि खोकल्याची समस्या असल्याने एका खाजगी रुग्णालयात गेले होते. याठिकाणी उपचार घेत असताना लक्षणे कोरोनासमान असल्याने संबधित डाॅक्टरांनी जिल्हा रुग्णालयात कळवून देत संबधिताला रुग्णालयात भरती केले होते. याठिकाणी कोरोना चाचणीनंतर बाधिताला संसर्ग झाल्याचे समोर आले होते. कुटुंबात कोणी पॉझिटिव्ह आढळले कोणी आढळले
बाधित रुग्णासोबतच त्याची आई, मुलगी आणि मुलगा असे तिघे बाधित असल्याचे समोर आले होते. हे तिघेही आज सामान्य जीवन जगत आहेत. मुलगा कोरोनातून बरा झाल्यावर बीएस्सीच्या अभ्यासक्रमात व्यस्त आहे. मुलगी एसएससीची उत्तीर्ण झाली आहे. तर ७३ वर्षीय आई सामान्य जीवनमान जगत आहे. आठ महिन्यांनी त्या कुटूुंबियांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.