दुष्काळझळांचा असाही मारा लागवडीचा खर्च वाया गेला सारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:15 PM2019-06-02T12:15:09+5:302019-06-02T12:15:16+5:30
गुलाबसिंग गिरासे। लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : चार-सहा महिने राबून उभे केलेले पीक केवळ पाणी नसल्याने डोळ्यासमोर कोरडे होताना ...
गुलाबसिंग गिरासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : चार-सहा महिने राबून उभे केलेले पीक केवळ पाणी नसल्याने डोळ्यासमोर कोरडे होताना बघत शेतकरी दिवस काढत असल्याचे वास्तव सध्या तळोदा तालुक्यात अनुभवण्यास येत आह़े एकनव्हे प्रत्येक गावात किमान चार ते पाच बागायतदार शेतकरी पिकांची दुर्दशा छातीवर दगड ठेवून बघत आहेत़
मोड ता़ तळोदा येथील शेतकरी संजय कडू शिंदे यांनी जुलै 2018 मध्ये चार एकर क्षेत्रात केळी लावली होती़ लागवडीनंतर 10 महिने पूर्ण झाल्यानंतर अचानक टय़ुबवेलचे पाणी बंद झाल़े कूपनलिका पूर्णपणे कोरडी झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आल़े पाणी देण्याचे दुसरे साधन नसल्याने त्यांना केळीची दुर्दशा गेल्या महिनाभर डोळ्यांनी बघावी लागली़ महिन्याभरापूर्वी हिरवीगार असलेली केळीची बाग आता शुष्क झाली असून त्याचा म्हणूनही उपयोग शक्य नाही़ शिंदे यांनी एकरी 40 हजार रुपये लागवड खर्च केला होता़ त्यांच्यासोबतच अंबालाल छगन नवले यांचे पाच एकर, एकनाथ माधव चव्हाण यांचे 4 एकर आणि जगन्नाथ चौधरी यांच्या सात एकर क्षेत्रातील केळीला पाणी न मिळाल्याने उत्पादन खर्चही निघू शकलेला नाही़ या शेतक:यांनी शेतात नांगर फिरवत केळीची झाडे काढून टाकली होती़ त्यांनी शेतातून काढून टाकलेली झाडे याच परिसरात पडून आहेत़ त्यांना जनावरेही खात नसल्याचे सांगण्यात आले आह़े शेतात ठिबक सिंचनासह महागडी खते, मजूरी आणि इतर खर्च मिळून किमान पाच लाखांर्पयत खर्च करुनही अशी स्थिती आल्याने शेतकरी हताश झाले आहेत़
मोड, बोरद, खरवड, त:हावद, खेडले, तळवे या भागातील हिरवळ गेल्या महिनाभरात हरवली आह़े ऊस, केळी आणि पपईला पाणीच नसल्याने शेतक:यांना पिक सोडून देण्यावाचून पर्याय नसल्याचे चित्र आह़े शेतक:यांनी पिकांना पाणी देण्याचा अंदाज बांधूनही अचानक कूपनलिका बंद पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े तालुक्यातील या प्रकारामुळे शेतकरी गोंधळले असून पुढे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आह़े