नंदुरबार जिल्ह्यात कापूस व्यापा:यांकडून शेतक:यांची फसवणूक

By admin | Published: June 17, 2017 05:57 PM2017-06-17T17:57:00+5:302017-06-17T17:57:00+5:30

पळाशी येथील शेतक:यांने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आह़े

Cotton Business in Nandurbar: Fraud of these farmers | नंदुरबार जिल्ह्यात कापूस व्यापा:यांकडून शेतक:यांची फसवणूक

नंदुरबार जिल्ह्यात कापूस व्यापा:यांकडून शेतक:यांची फसवणूक

Next

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 17 - तालुक्यातील 30 ते 35 कापूस उत्पादक शेतक:यांकडून कापूस खरेदी करून त्याचे पैसे न देताच व्यापारी फरार झाल्याची घटना उघडकीस आली आह़े पळाशी येथील शेतक:यांने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आह़े कापूस खरेदी करणारा व्यापारी हा शहादा तालुक्यातील करणखेडा येथील असल्याची माहिती आह़े     
गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापासून शिंदे, पळाशी, कोळदे, लहान शहादे, पातोंडा, खोडसगाव या गावांमधील शेतक:यांकडून मुकूंद ऊर्फ नीलेश मणिलाल पाटील रा़ करणखेडा ता़ शहादा या व्यापा:याने कापसाची खरेदी केली होती़ प्रत्येक शेतक:याकडून साधारण 100 ते 300 क्विंटल एवढा  कापूस  पाटील याने खरेदी केला होता़ या खरेदीनंतर शेतक:यांना पैसे नंतर देतो, असे सांगून संबधित व्यापारी पसार झाला आह़े शेतकरी गेल्या सात महिन्यापासून हा कापूस व्यापारी शेतक:यांना पैश्यांसाठी फिरवत होता़ मात्र तो सापडून न आल्याने अखेर पळाशी येथील एका शेतक:याने पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आह़े संशयित व्यापारी निलेश पाटील याने नंदुरबार तालुक्यातून साधारण एक कोटी रूपयांच्या वर कापसाची खरेदी केल्याची माहिती आह़े संबधित व्यापारी हा सात महिन्यांपासून नेमका कुठे आणि कोणासोबत आह़े याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ उपनगर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पैश्यांची वसुली करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आह़े 

Web Title: Cotton Business in Nandurbar: Fraud of these farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.