कापूस उत्पादकांना यंदा दिलासा सप्टेंबर अखेरपर्यंत विक्री करता येईल कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:57 AM2020-12-28T11:57:55+5:302020-12-28T11:58:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी होणारी गर्दी ...

Cotton growers will be able to sell cotton till the end of September this year | कापूस उत्पादकांना यंदा दिलासा सप्टेंबर अखेरपर्यंत विक्री करता येईल कापूस

कापूस उत्पादकांना यंदा दिलासा सप्टेंबर अखेरपर्यंत विक्री करता येईल कापूस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता यंदा सीसीआयचे खरेदी केंद्र हे ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार कापूस खरेदी     केंद्रावर दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापूस खरेदी होत आहे. भाव देखील समाधानकारक असल्याचे चित्र आहे. 
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीपासूनच कापूसला यंदा चांगला भाव मिळत आहे. शेतकरी कापूस विक्रीसाठी देखील घाई करीत असल्याचे दिसून येत आहे. 
यंदा एक लाख हेक्टर
यंदा जिल्ह्यात एक लाख हेक्टर कापूस लागवड झाली आहे. परंतु अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर यंदा परिणाम झाला आहे. कापूसची क्वाॉलीटी देखील खराब झाली असल्याचे चित्र होते. परंतु आता नंतर निघणारा कापूस हा चांगला दर्जाचा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. 
विक्रीसाठी झुंबड
सीसीआयच्या विक्री केंद्रांवर कापूस विक्रीसाठी झुंबड उडत आहे. दररोज २०० पेक्षा अधीक वाहने विक्रीसाठी येत आहेत. साधारणत: पाच हजारापेक्षा अधीक कापूस येथे खरेदी होत आहे. होणारी गर्दी आणि त्यामुळे तोलाईसाठी लागणारा विलंब यामुळे शेतकरी नाराज होतात. त्यातून वाद देखील होत आहेत. ही बाब लक्षात घेता यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत कापूस खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे. 
भाव समाधानकारक
कापसाला यंदा भाव बऱ्यापैकी मिळत आहे. चांगल्या दर्जाचा कापूस पाच हजार ७५० रुपयेपर्यंत विक्री होत आहे. तर कमी दर्जाचा कापूस हा किमान  पाच हजार ४३० रुपये क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. खाजगी व्यापारींकडून अर्थात खेडा खरेदीत देखील साडेपाच हजारापर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. 
शेतकऱ्यांनी चांगला दर्जाचा कापूस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. कमी दर्जाचा कापसाला सीसीआयच्या नियमानुसार कमी भाव द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा वाद देखील होतात. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगला कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक
सीसीआयच्या नंदुरबार व शहादा केंद्रात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक खरेदी झालेली आहे. ती आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. सद्या वाढलेली आवक पहाता आणखी नऊ महिने खरेदी सुरू राहणार आहे. 

Web Title: Cotton growers will be able to sell cotton till the end of September this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.