वादळी पावसाने तळोद्यात कापूस, पपईचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:09 PM2018-09-20T15:09:49+5:302018-09-20T15:09:54+5:30

50 एकर क्षेत्रातील पिकांना हाणी : मोहिदा, कळमसरे, सिलींगपूर परिसराला तडाखा

Cotton, papaya damages in thorny rain | वादळी पावसाने तळोद्यात कापूस, पपईचे नुकसान

वादळी पावसाने तळोद्यात कापूस, पपईचे नुकसान

Next

तळोदा : मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील मोहिदा, कळमसरे, सेलिंगपूर शिवारातील कापूस, पपई, केळी व उसाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. साधारण 40 ते 50 एकर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतक:यांचे  म्हणणे आहे. दरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून, शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.
तळोदा तालुक्यातील रांझणी, मोड, मोहिदा परिसरात मंगळवारी दुपारी अचानक वादळी पाऊस पडला. तब्बल तास भर झालेल्या मुसळधार पावसाने पपई, कापूस, केळी व ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. 
वदळाचा वेग इतका होता की, त्यात गणेश पाटील यांच्या अडीच एकरातील पपईची झाडे अक्षरश: मोडून पडली आहेत. याशिवाय  कापूस व ऊसदेखील अक्षरश: भुईसपाट झाली आहेत. तब्बल तीन आठवडय़ापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र  मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने साहजिकच या भागात शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  तथापि काही शेतक:यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी पावसाने हिरावल्याने या शेतक:यांमध्ये नैराश्य पसरले आहे. 
वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक:यांमध्ये गणेश शंकर पाटील यांचे चार एकर पपई, बाळू नथ्थू शिंदे यांचा चार एकर कापूस, मगन दत्तू शिंदे यांचा चार एकर कापूस, लक्ष्मण पुंडलिक चौधरी यांचा तीन एकर कापूस, रमण परशराम शिंदे यांचा चार एकर कापूस, मणिलाल छगन पाटील यांचा तीन एकर कापूस, उत्तमसिंग हिम्मतसिंग गिरासे यांचा दोन एकर कापूसाचे नुकसान         झाले.
याबाबत मोहिदाचे उपसरपंच आनंद चौधरी, लक्ष्मण शिंदे, धनंजय शिंदे, संजय चव्हाण, विठ्ठल पाटील यांनी महसूल प्रशासनास नुकसानीची माहिती दिल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तलाठी धनगर व के.एस. पाटील यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या कर्मचा:यांनी बुधवारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केल्यानंतर पंचनाम्यांची कार्यवाही सुरू केली आहे. या वादळी पावसामुळे शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी या शेतक:यांची मागणी आहे.
 

Web Title: Cotton, papaya damages in thorny rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.