भूजल पातळी खालावल्याने कापसाची लागवड धोक्यात
By Admin | Published: June 21, 2017 05:27 PM2017-06-21T17:27:13+5:302017-06-21T17:27:13+5:30
10 हजार हेक्टरवर लागवड : नंदुरबार तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.21 - जिल्ह्यातील विविध भागात तब्बल 10 हजार हेक्टरवर बागायत कापूस लागवड झाली असून भूजल पातळी खालावल्याने हे उत्पादन धोक्यात आले आह़े तर दुसरीकडे नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आह़े पूर्व भागातील शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीला लागले आहेत़
गेल्या 10 जून नंतर दडी मारलेल्या पावसाची प्रतिक्षा जिल्ह्यात कायम आह़े तब्बल 10 दिवस उलटूनही जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकामांवर परिणाम झाला आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात 9 रोजी मुसळधार पाऊस झाला होता़ यामुळे शेतक:यांमध्ये उत्साह संचारला होता़ पहिला पाऊस दमदार झाल्याने उल्हासित झालेल्या शेतक:यांनी कापूस, ज्वारी आणि मकासह कडधान्याची पेरणी केली होतील़ पाऊस नसल्याने बियाणे खराब होण्याची भिती आह़े
खरीप पिकांची पेरणी सुरू असताना केळी आणि पपई लागवडीकडे शेतकरी लक्ष देत आहेत़ शहादा तालुक्यात 836 हेक्टर केळी तर 905 हेक्टरवर पपई लागवड पूर्ण झाली आह़े तालुक्यात 17 हेक्टर हळद पिक लागवड झाली आह़े याच तालुक्यात कोरड क्षेत्रात 734़50 हेक्टर ज्वारी, 968 हेक्टर मका, 107़50 हेक्टर तूर आणि 725 हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आह़े या तालुक्यात अद्याप केवळ 27 मिलीमीटर पावसाची नोंद आह़े जमिनीतील भूजल खालावूनही तालुक्यात पावसाच्या भरवशावर शेतक:यांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र पाऊस न आल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत़
नंदुरबार तालुक्यातील न्याहलीसह पूर्व भागात गेल्या 9 आणि 10 जून रोजी मुसळधार पाऊस झाला होता़ या पावसामुळे या भागातील बंधा:यांमध्ये जलसाठा झाला होता़ मूग आणि भूईमूगाचे जमिनीत टाकलेले बियाणे धोक्यात आले आह़े या भागात पुन्हा दुष्काळाची भिती व्यक्त करण्यात येत आह़े