बनावट विडी विक्री करणा:यावर कारवाइ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:41 PM2019-08-31T12:41:53+5:302019-08-31T12:41:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परवानाधारक विडी उत्पादक कंपनीच्या नाव वापरत बनावट विडी उत्पादन तयार करुन त्याची विक्री करणा:या ...

Counterfeit Video Sellers: Action on It | बनावट विडी विक्री करणा:यावर कारवाइ

बनावट विडी विक्री करणा:यावर कारवाइ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : परवानाधारक विडी उत्पादक कंपनीच्या नाव वापरत बनावट विडी उत्पादन तयार करुन त्याची विक्री करणा:या अक्कलकुवा येथील विक्रेत्यावर पोलीस कारवाई करण्यात आली़ एका खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीने या प्रकरणाचा शोध घेत पोलीसांना माहिती दिली होती़ 
जळगाव जिल्ह्यातील खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीला जिल्ह्यात बनावट विडीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना माहिती दिली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हाशाखेचे पथकाने बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रकाशा ता़ शहादा येथील हाजीपार पानसेंटर येथे छापा टाकून बनावट विडीचा माल ताब्यात घेतला होता़ दुकान मालक अनिस मुसा मेमन याची पथकाने चौकशी केल्यावर त्याने अक्कलकुवा येथून माल आणल्याचे समजून आल्यानंतर पथकाने तेथे भेट देत परदेशी गल्लीतील विनोद भगवानदास बनिया याच्या दुकानात छापा टाकून कारवाई केली़ दोघा संशयितांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन त्याठिकाणी चौकशी करण्यात येऊन गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ 
याबाबत अशोकराज सुभाष तायडे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अनिस मुसा मेमन रा़ प्रकाशा व विनोद भगवानदास बनिया रा़ परदेशीगल्ली अक्कलकुवा या दोघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आह़े दोघांकडून 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत वसावे करत आहेत़ ही कारवाई गुन्हे शाखेचे प्रवीण राजपूत, किरण पावरा यांच्यास अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी केली़ दोघांविरोधात कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली आह़े अक्कलकुवा येथील विनोद बनिया याने ही विडी नेमकी कोणाकडून आणली, तिचा कारखाना कोठे आह़े यासह विविध माहिती घेण्यात येत आह़े पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली़ 

Web Title: Counterfeit Video Sellers: Action on It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.