कोर्ट कमिटमेंटमुळे गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:41 AM2019-01-03T11:41:07+5:302019-01-03T11:41:12+5:30
पोलीस अधीक्षक : आज वर्षपूर्तीनिमित्त उत्कृष्ट काम करणा:यांचा सन्मान
नंदुरबार : वर्षभर राबविण्यात आलेल्या कोर्ट कमिटमेंट प्रोगाममुळे न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले. या कमिटमेंट प्रोगामच्या वर्षपुर्तीनिमित्ताने गुरुवारी उत्कृष्ट कामगिरी करणा:या अधिकारी व कर्मचा:यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.
गेल्या जानेवारी महिन्यापासून पाच कलमी कार्यक्रमाअंतर्गत कोर्ट कमिटमेंट प्रोगाम सुरू करण्यात आला होता. याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्रुटी रहित तपास करण्यावर भर देवून विविध गुन्ह्यांचा तपास वेळेत पुर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे, न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर साक्षीदार, आरोपी यांचा समन्स वॉरंटची बजावणी वेळेत करणे अशा बाबींसंदर्भात हा उपक्रम आहे. यातील पाच कलमांमध्ये उत्कृष्ट व वेळेत तपास करणे, समन्स वॉरंट बजावणीबाबत पैरवी अधिकारी व सरकारी वकील यांनी दररोज आढावा घेणे. पोलीस व सरकारी वकील यांनी साक्षी अगोदर समन्वय साधणे. पोलीस साक्षीदार व तपास अधिकारी यांची दररोज मुलाखत घेणे आणि उत्कृष्ट तपास व गुन्हे शाबीततीकरीता प्रोत्साहनपर बक्षीस तसेच प्रमाणपत्र वाटप करणे आदींचा त्यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्हे शाबीतीचे प्रमाण वाढण्यास व आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाली आहे. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2018 दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत समन्स व वॉरंट बजावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अपेक्षीत अशी फलश्रुती कोर्ट कमिटमेंट प्रोगाममुळे प्राप्त झाली आहे. 3 जानेवारी रोजी वर्षपूर्ती सोहळा जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सर्व पोलीस अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वर्षभरात सवरेत्कृष्ट कामगिरी करणा:या पोलीस अधिकार, कर्मचारी यांचा गौरव करण्यात येणार आहे. याचवेळी फेज दोनची सुरुवात व अंमलबजावणी करण्यात येणार आहे.