न्यायालयाच्या निकालाने बदलले शहाद्यातील राजकारणाचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:07 PM2018-09-25T12:07:26+5:302018-09-25T12:07:33+5:30

The court's ruling changed the color of Shahada politics | न्यायालयाच्या निकालाने बदलले शहाद्यातील राजकारणाचे रंग

न्यायालयाच्या निकालाने बदलले शहाद्यातील राजकारणाचे रंग

Next

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांना ‘स्टे’ मिळताच तालुक्यातील निवडणुकीचे वातावरण एकदम निवळल्याने गणेशोत्सवातील उत्साह देखील कमी झाला. धुमधडाक्यात सुरू झालेला गणेशोत्सव निवडणुकीच्या स्थगितीमुळे या निवडणुकीतील भावी उमेदवारांनी मदतीचा हात आखडता घेतल्याने उत्सवाची सांगता निरुत्साहात झाली.
ऐन गणेशोत्सव काळात तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्याने सारा तालुका निवडणूकमय झाला होता. विशेषत: पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमुळे तालुक्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. पं.स. आणि जि.प. निवडणुकीचे गट-गण रचना जाहीर झाल्यावर भावी उमेदवारांनी सोयीच्या गट-गणांची चाचपणी केली होती. त्यानंतर गट-गणांचे आरक्षण जाहीर झाल्यावर भावी उमेदवारांनी निवडणूक लढविणार असलेल्या गट-गणात लक्ष केंद्रीत करून संपर्क अभियानही सुरू केले होते. गणेशोत्सवात निवडणूक लागल्याने गणेश मंडळांच्या कार्यकत्र्याचा आनंद द्विगुणीत झाला. भावी उमेदवारांनी देखील गणेश मंडळाचे कार्यकर्ते निवडणुकीत ‘मदतद करतील या अपेक्षेने गणेश मंडळांना भरभरुन मदत केल्याने गणेशोत्सवाची सुरुवात मोठय़ा धुमधडाक्यात झाली. भावी उमेदवारांनी गट-गणातील मंडळांना भरभरून मदत केल्याने संपूर्ण गणेशोत्सव आनंदात पार पडेल, अशी गणेशभक्तांची अपेक्षा होती. मात्र गट-गणातील आरक्षण, रचना आदी मुद्यांवर राजकीय पक्षातील नेत्यांनीच आक्षेप अकोला व वाशीम जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपाठोपाठ धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदांनादेखील न्यायालयाने तीन महिन्यांची स्थगिती दिल्याने तालुक्यातील निवडणुकीची हवा ‘गुल’ झाली. निवडणुकीस स्थगिती मिळताच भावी उमेदवारांनी गट-गणातील संपर्कासही स्थगिती दिल्याने गणेशोत्सवाचा उत्साह अध्र्यावरच थांबला. भावी उमेदवारांनी मोठय़ा उत्साहात गणरायांची स्थापना केली. मात्र गणरायांना निरोप देण्याच्यावेळी हात आखडता घेतल्याने गणेश विसजर्नातला उत्साह मावळला.गण-गणाचे आरक्षण जाहीर झाल्याबरोबर राजकीय पक्षांच्या आखाडय़ातही सोयीचा गट-गण मिळविण्यासाठी भावी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. शहादा तालुक्यात जि.प. गटाच्या एकूण 14 जागांपैकी केवळ चार जागा इतर मागासवर्गीय गटासाठी (ओबीसी) त्यातही दोन महिलांसाठी राखीव असल्याने ओबीसी पुरुषांसाठी असलेल्या फक्त दोन जागांसाठी भावी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. पाडळदा बुद्रुक व म्हसावद या ओबीसी जागेसाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील तुल्यबळ उमेदवारांनी दावेदारी केली होती. निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकत्र्याचे मेळावे घेऊन निवडणुकीचे वातावरण तापले होते. निवडणुकीला ‘स्टे’ मिळाल्यामुळे हे वातावरणही निवळले आहे.
 

Web Title: The court's ruling changed the color of Shahada politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.