दुर्गम भागात दवबिंदूंचे आच्छादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:35 AM2019-01-02T11:35:30+5:302019-01-02T11:35:35+5:30
डाब येथे दवबिंदू गोठले : दाट धुक्यांनी व्यापला परिसर, थंडीची लाट कायम
वाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात मोठय़ा प्रमाणात थंडीची लाट आह़े वाण्याविहिर तसेच डाब परिसर धुक्यांनी व्यापला जात आह़े सकाळी हिरव्या गार गवतांवर दवबिंदू दिसून येत आह़े सूर्यकिरणांमुळे हे दवबिंदू एखाद्या माणकाप्रमाणे चकाकत आह़े अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे दव¨बंदू गोठल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितल़े
नंदुरबार शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण अधिक आह़े त्यामुळे थंडीमुळे विशेषत: ग्रामीण भागातील जीवन अधिक प्रभावित होताना दिसून येत आह़े अक्कलकुवा तालुक्यात डाब सारख्या ठिकाणी अनेक वेळा किमान तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअसर्पयत जात असत़े परंतु या ठिकाणी तापमान मोजण्यासाठी यंत्रणा नसल्याने याबाबत अधिक माहिती मिळू शकत नाही़ डाब येथे अनेक वेळा दवबिंदू गोठत असतात़ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्ष व झाडाझुडपांची संख्या असल्याने हवेत गारवा दिसून येत असतो़ त्याच सोबत सध्या या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात थंड वारे वाहत असल्याने परिसरात गारठा अधिक जाणवत आह़े
जनजीवन विस्कळीत
उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वा:यांमुळे मागील तीन दिवसात सातपुडा परिसरात थंडीत वाढ झालेली दिसून येत आह़े याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आह़े दुर्गम भागात गोठवणारी थंडी निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच सकाळ व रात्री ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून येत आह़े थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळवत आह़े
गेल्या पंधरवाडय़ापासून थंडीची लाट कायम आह़े त्यामुळे साहजिकच रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत असल्याने चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, थंडीत वाढ होत असल्याने साथरोगांची भितीदेखील वाढली आह़े त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठय़ा संख्येने गर्दी होताना दिसून येत आह़े