शहाद्यातील तितरी गावाजवळ कत्तलीसाठी जाणा:या गायी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:44 PM2018-03-20T12:44:22+5:302018-03-20T12:44:22+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 20 : शहादा तालुक्यातील तितरी गावाजवळ कत्तलीसाठी जाणा:या सहा गायी व दोन वासरांना वाहनासह पोलीसांनी ताब्यात घेतल्या़ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला़ गायींच्या विक्रीला कायद्याने बंदी असतांना कत्तलीसाठी गायींची सर्रासपणे खरेदी करण्याच्या या प्रकाराने शहादा तालुक्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली़
या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालकाला अटक करण्यात आली तर अन्य दोघे फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील खेतिया येथे शनिवारी आठवडेबाजार भरतो. शनिवारी रोजी खेतिया बाजारातून सहा गायी व दोन वासरे खरेदी करून टेंभ:या खेत्या पटले, रा.शहाणा (51) व चालक अनिल तुरसिंग भामरे (24) रा.शहाणा हे एमएच 39- जी 7314 या पिकअप वाहनातून शिरपूरकडे घेऊन जात होत़े खेतिया येथून भमराटानाकाकडून मंदाणे मार्गावरील तितरी गावातून वडगाव-शहाणेकडे जात असतांना तितरी गावाजवळ मनसेचे तालुकाध्यक्ष राजेश ठोबा पावरा यांना या वाहनाचा संशय आल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाहन थांबविले. यावेळी वाहनात पाय बांधलेल्या अवस्थेत गायी व वासरू आढळून आले. गाय आणि वासरू शिरपूर येथील कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची माहिती वाहनचालक याने सांगितल्यानंतर राजेश पावरा यांनी असलोदन औटपोस्टला माहिती दिली़ यानंतर काही वेळात पोलीस कॉन्स्टेबल दासू वसावे, नवनाथ चव्हाण, सुरेश भिल यांनी घटनास्थळी येवून वाहन ताब्यात घेतले व गायी, वासरांची सुटका करून तितरी येथील पोलीस पाटील यांच्याकडे तात्पुरते दिल़े
उपविभागीय पोलीस अधिका:यांची भेट
शिरपूरकडे कत्तलीसाठी जाणा:या गायींना वाहनासह पकडून पालिसांच्या हवाली केल्यानंतर रविवारी दिवसभर पोलिसांनी गायी खरेदीबाबत गायीमालक, वाहन मालक व चालक यांच्याकडे संपूर्ण चौकशी केली असता वाहन परवानासह कोणतीही कागदपत्रे व गायी खरेदी पावत्या आढळून आल्या नाही. त्यामुळे या गायी वाहनामध्ये कोंबून व त्यांना होतील, अशा रितीने क्षमतेपेक्षा जास्त गायी कोंबून बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.के. जाधव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी सहका:यांसह तितरी गावाला भेट देवून गायींची पाहणी केली.
या वेळी महारू पाटील यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर चौकशीअंती पोलीस कॉन्स्टेबल दासू वसावे यांनी रविवारी रात्री शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देवून वाहनचालक अनिल तुलसिंग पावरा, गाडी मालक टेंभ:या खेत्या पटले, गायी मालक उदयसिंग पराडक सर्व रा.शहाणे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ यातील अनिल पावरा यास तात्काळ अटक करण्यात आली़ वाहनासह गायींची सुमारे एक लाख 59 हजार रूपये किंमत असून, वाहन व गायी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांविरोधात संशयितांविरोधात पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आह़े