तळोद्यात माकपचा मोर्चा

By admin | Published: July 1, 2017 04:58 PM2017-07-01T16:58:28+5:302017-07-01T16:58:28+5:30

लाभाथ्र्याना अनुदान हप्त्यांचे त्वरित वाटप करण्याची मागणी

CPI (M) 's Front in Pallod | तळोद्यात माकपचा मोर्चा

तळोद्यात माकपचा मोर्चा

Next

ऑनलाईन लोकमत

तळोदा,दि.1 - शेतमजूर युनियनच्या विविध मागण्यांसाठी माकप व शेतमजूर युनियन महाराष्ट्र राज्य धुळे-नंदुरबारतर्फे येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.
शहरातील दूध संघाच्या कार्यालयापासून मोर्चास सुरुवात करण्यात येऊन मेन रोडमार्गे बसस्थानक परिसर, स्मारक चौक या मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्र शासनाने शेतमजुरांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करावे, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत दरमहा शेतमजूर, वृद्ध स्त्री-पुरुष, अपंग, परिव्यक्ता यांना तीन हजार रुपये पेन्शन अदा करावे, गरीब शेतकरी व शेतमजुरांना पिवळे रेशन कार्ड देऊन प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य द्यावे, सरकारी पडीक गायरान जमीन भूमिहीन शेतक:यांना वाटप करून त्यांच्या नावे करून द्यावी, आदिवासी वनाधिकार कायद्याप्रमाणे पिके घेणा:या कुटुंबास जमीन              वाटप करून सातबारा उतारा देण्यात यावा, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभाथ्र्याना अनुदान हप्ते त्वरित देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
 या मोर्चाचे नेतृत्व जयसिंग माळी, दयानंद चव्हाण, अनिल ठाकरे, बाबूलाल नवरे, मंगलसिंग चव्हाण, इंदिराबाई चव्हाण, कैलास चव्हाण, तुळशीराम ठाकरे, लक्ष्मण ठाकरे, रमण पवार, छोटू ठाकरे, श्यामसिंग पाडवी, सुभाष ठाकरे आदी कार्यकत्र्यानी  केले.

Web Title: CPI (M) 's Front in Pallod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.