कुपोषित बालकाच्या पालकांवर गुन्हा
By admin | Published: February 8, 2017 01:15 AM2017-02-08T01:15:25+5:302017-02-08T01:15:25+5:30
रुग्णालयात उपचार : अक्कलकुवा येथे सापडले होते बालक
नंदुरबार : अक्कलकुवा बसस्थानक परिसरात गेल्या आठवडय़ात बेवारस स्थितीत सापडलेल्या दोन वर्षीय कुपोषित बालकाच्या अज्ञात मातापित्यांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला़ या बालकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
अक्कलकुवा बसस्थानकात एक फेब्रुवारी दुपारी साडेबारा सुमारास अज्ञात व्यक्तीने काटेरी झुडपांमध्ये बालक बेवारस पद्धतीने सोडून दिल्याचे दिसून आले होत़े बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले होत़े या बालकाला ताब्यात घेत पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिले होत़े याठिकाणी त्याचे वजन केले ते चार किलोपेक्षा कमी भरल्याने बालक कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले होत़े या बालकाच्या सर्व तपासण्या पूर्ण करण्यात येऊन त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रताप चाटसे उपचार करत आहेत़ पोलिसांकडून या बालकाच्या माता पित्यांचा शोध घेतला जात होता़ मात्र ते मिळून न आल्याने पोलीस प्रशासनाने अज्ञात मातापित्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता़ यानुसार सोमवारी दुपारी पोलीस कॉन्स्टेबल खुशाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन वर्षीय कुपोषित बालकाच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दुर्गम, अती दुर्गम भागासह तालुक्यातील विविध भागात जावून बालकाच्या माता पित्याचा शोध घेत आहेत़ धडगाव व अक्कलकुवा परिसरात याबाबत माहिती देण्यात येत आह़े तसेच पोलिसांकडून स्थलांतर करणा:या मजुरांकडेही चौकशी करण्यात येत आह़े
या बालकाच्या विविध तपासण्या पूर्व करण्यात येऊन त्याच्यावर उपचार करण्यात येत आह़े अक्कलकुवा रुग्णालय प्रशासनाकडून या बालकाला सकस आहार व दूधासह इतर पदार्थ पुरवण्यात येत आहेत़ या कुपोषित बालकाची प्रकृती सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली आह़े