अक्कलकुव्यात दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:40 AM2019-02-14T11:40:41+5:302019-02-14T11:40:41+5:30
अक्कलकुवा : घटना वाढल्याने भिती
नंदुरबार : दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाºया तिघा संशयीतांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक केल्यास त्यांच्याकडून इतर चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
अक्कलकुवा येथील हनुमान मंदीराजवळ राहणारे संतोष वासुदेव सोनार यांनी आपली दुचाकी (एमएच ३९- एच ०२४१) घराच्या अंगणात उभी केली होती. १२ रोजी तीन जण त्यांची दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिघांना हटकले. त्यानंतर अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दाखल केली. सोनार यांच्या फिर्यादीवरून दिनेश दिलीप पाडवी, रा.जमाना, ता.अक्कलकुवा, सचिन धिरसिंग वळवी व बोंड्या वळवी रा.सल्लीबार, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वसावे करीत आहे.
दरम्यान, फिर्यादीने नावे दिली असल्याने संशयीतांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.