पोलीसांच्या नोटीशीची अवमानना केल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:07 PM2019-07-10T12:07:24+5:302019-07-10T12:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : काकर्दे दिगर ता़ शहादा येथे पोलीसांकडून नोटीस देऊनही भांडण करुन अशांतता माजवणा:या एकाविरोधात गुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : काकर्दे दिगर ता़ शहादा येथे पोलीसांकडून नोटीस देऊनही भांडण करुन अशांतता माजवणा:या एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीसांनी यापूर्वी संबधितास संशयितास सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती़
काकर्दे दिगर येथील अंकुश देवा भिल याने चार दिवसांपूर्वी गावातील एकासोबत भांडण केले होत़े याची दखल घेत पोलीसांनी त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दखल करत फौजदारी संहिता 149 अंतर्गत नोटीस बजावून ताकीद दिली होती़ दरम्यान रविवारी संशयित अंकुश भिल याने गावात पुन्हा भांडण केल़े
गावात शांतता धोक्यात आल्याने प्रकाराची दखल घेत पोलीस कॉन्स्टेबल गोविंद दशरथ जाधव यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अंकुश भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बागले करत आहेत़