सोशल मिडियातील वादातून एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:16 PM2019-12-02T12:16:51+5:302019-12-02T12:16:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील धमडाई येथील एकाने समुदायाच्या भावना दुखावतील अशा कमेंटस सोशल मिडियात पोस्ट केल्या होत्या़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील धमडाई येथील एकाने समुदायाच्या भावना दुखावतील अशा कमेंटस सोशल मिडियात पोस्ट केल्या होत्या़ वाद निर्माण झाल्याने संशयिताविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आह़े
धमडाई येथील 22 वर्षीय संशयित युवकाने 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता स्वत:च्या मोबाईलमधील सोशल मिडिया अकाउंटवरुन आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा कमेंटस केल्या होत्या़ यातून वाद निर्माण झाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती़
याबाबत विजय कायसिंग पाडवी रा़ धमडाई यांनी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणी संशयितास पोलीसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांच्या मार्गदर्शनात पथकाने अटक केली होती़ त्याला तातडीने दुपारी नंदुरबार सेशन कोर्टात हजर केले असता, न्यायालयात तीन डिसेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली आह़े
तपास पोलीस उपअधिक्षक रमेश पवार करत आहेत़