उमरकुवा येथे मारहाण प्रकरणी अखेर जादुटोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:21 PM2019-02-12T21:21:10+5:302019-02-12T21:21:16+5:30

कोठार : उमरकुवा ता. अक्कलकुवा येथे डाकीण ठरवुन मारहाण केलेल्या प्रकरणात आरोपींविरुद्ध मंगळवारी अखेर जादुटोना विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल ...

The crime under the anti-Zadutana anti-liberation law at the end of the case in Umaruqua | उमरकुवा येथे मारहाण प्रकरणी अखेर जादुटोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा

उमरकुवा येथे मारहाण प्रकरणी अखेर जादुटोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा

Next

कोठार : उमरकुवा ता. अक्कलकुवा येथे डाकीण ठरवुन मारहाण केलेल्या प्रकरणात आरोपींविरुद्ध मंगळवारी अखेर जादुटोना विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डाकिणीच्या संशयावरून अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा येथील महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेत त्या पीडित महिलेचा हात मोडला होता. मारहाण करण्याच्या विरोधात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन डाकीणीच्या संशयावरून मारहाण केली व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींवर जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे आवश्यक असतांना अन्य कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत असलेली उदासिनता व जनजागृतीच्या अभावाबाबत ‘लोकमत’ने रविवारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे घडलेला प्रकार लक्षात घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींवर जादुटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अखेर मंगळवारी अगोदर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात जादुटोणाविरोधी कायद्याचे वाढीव कलम लावण्यात आले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ नुसार वाढीव कलम लावण्यात आले.दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकत्यांनीदेखील त्या महिलेची भेट घेवून घडलेला प्रकार जाणून घेतला.विधीज्ञांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी आरोपींवर जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन करण्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रबोधनासाठी पोलिस पाटीलांचे प्रशिक्षण अंनिस व पोलिस प्रशासनाच्या वतीने आगामी काळात घेण्यात येईल.
-मेघश्याम डांगे, पोलिस निरीक्षक, अक्कलकुवा़

Web Title: The crime under the anti-Zadutana anti-liberation law at the end of the case in Umaruqua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.