वाहतूकीस अडथळा प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:06 PM2019-08-28T12:06:25+5:302019-08-28T12:06:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, विसरवाडी, सारंगखेडा  येथे वाहतुकीस अडथळा आणणा:या 14 जणांविरुद्ध ...

Crimes against 14 people for obstructing trafficking | वाहतूकीस अडथळा प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा

वाहतूकीस अडथळा प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, मोलगी, अक्कलकुवा, विसरवाडी, सारंगखेडा  येथे वाहतुकीस अडथळा आणणा:या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
धडगाव येथे चौकात मगन रुमल्या पावरा यांनी महिंद्रा पीकअप वाहन भर रस्त्यावर लावून वाहतूक अडथळा आणला. जमादार अभय मोरे यांच्या फिर्यादीवरून मगन पावरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडदिगर गावात नितीन जयप्रकाश भारती, रा.ब्राम्हणपुरी यांनी मालवाहू वाहन रस्त्यावर उभे करून अडथळा आणला. पोलीस नाईक घन:शाम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून नितीन भारतीविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलगी येथे बाजारात नितेश दाज्या पाडवी यांनी प्रवासी वाहन रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा आणला. याबाबत पोलीस नाईक गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून नितेश पाडवीविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्कलकुवा येथे बसस्थानक परिसरात विष्णू विनेश पाडवी याने मालवाहू वाहन उभे करून अडथळा आणला. हवालदार गुलाब जोहरी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील काका का ढाबाजवळ दिनेश इंद्रसिंग राजपूत याने व्हॅन रस्त्यावर लावून अडथळा आणला. पोलीस नाईक साहेबराव गावीत यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचपाडा येथे मंगेश किसन वसावे याने प्रवासी रिक्षा बाजार चौकात उभी करून अडथळा आणला. पोलीस कर्मचारी साहेबराव जाधव यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विसरवाडी येथे बाजारात आशिष सुभाष वळवी यांनी प्रवासी रिक्षा उभी करून रहदारीस अडथळा आणला. पोलीस शिपाई सिताराम पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील साक्री रोडवरील मध्यवर्ती कारागृह परिसरात काशिनाथ आत्माराम बोरसे यांनी प्रवासी रिक्षा रस्त्यावर उभी केली. हवालदार अनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा बसस्थानक परिसरात कुणाल भटू राजकुळे यांनी वाहन रस्त्यावर लावले. पोलीस कर्मचारी उमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ठिकाणी इरफान वजीरोद्दीन शेख यांनी देखील वाहन उभे केले. सागर संजय जव्हेरी यांच्या फिर्यादीवरून देखील तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सारंगखेडा बसस्थानकात प्रदीप विठ्ठल राजपूत यांनी रस्त्यावर मालवाहू वाहन लावले. पोलीस कर्मचारी दिनेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसात नोंद करण्यात आली. 
शहादा येथे गांधी पुतळासमोर असलम अलमास बागवान यांनी फळ विक्रीची लॉरी लावली. पोलीस शिपाई अजय पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.     
 

Web Title: Crimes against 14 people for obstructing trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.